छत्रपती संभाजीनगर: येथील ख्यातनाम वाईल्डलाईफ फोटोग्राफर बैजू पाटील यांना सन २०२३ चा ग्रेट ब्रिटनचा प्रतिष्ठित मोनोव्हिजन्स ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोग्राफी ॲवार्ड जाहिर झाला आहे. दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे.
ग्रेट ब्रिटनचा प्रतिष्ठित मोनोव्हिजन्स ब्लॅक ॲण्ड व्हाईट फोटोग्राफी अवॉर्ड ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात भारतातील प्रख्यात छायाचित्रकार बैजू पाटील यांना दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस जाहीर करण्यात आलेले आहे. जगभरातील २७ देशातील छायाचित्रकारांनी त्यांच्या ३७ हजार छायाचित्रांचा या स्पर्धेत सहभाग नांदविला होता. 'ब्लॅक अँड व्हाईट वन्यजीव' हा या स्पर्धेचा विषय होता. बैजू पाटील हे मागील ३६ वर्षापासून वाइल्डलाईफ फोटोग्राफी करत आहेत. आतापर्यंत त्यांच्या नावावर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कार आहेत.
काय आहे फोटोमध्ये
या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाच्या बक्षीस मिळवून देणारा फोटो पाटील यांनी राजस्थान येथील भरतपूर बर्ड सेंचुरी या पक्षी अभयारण्यात येथे काढलेला आहे. तेथे काही प्रमाणात वन्य प्राणीही दिसतात. ॲवार्ड विजेता फोटो थंडीच्या दिवसात काढलेला आहे. या छायाचित्रांमध्ये दोन कोल्हे एकमेकांना भांडत असल्याचे दिसत आहे. तर अन्य एक मध्यभागी उभा राहून त्यांची गंमत बघत आहे. भरतपूर मध्ये हिवाळ्यात खूप जास्त थंडी पडल्यामुळे अनेक प्राणी मरून पडतात. हे मृत प्राणी खाण्यासाठी आकाशामध्ये कावळे व गिधाड हवेत उडून तिथे गिरट्या मारतात आणि खाली उतरतात. यामुळे तेथे मोठ्या प्रमाणात पक्षांचा आवाज होतो. पक्ष्यांचा आवाजामुळे हे प्राणी या ठिकाणी आकर्षित होतात. पाच ते सहाच्या कळपाने येऊन त्यांच्यात मृत प्राण्याचे मांस खाण्यासाठी चढाओढ लागते. यातून या प्राण्यांचे भांडण होत असते. प्रत्येक जण हे खाण्यासाठी आपला पहिला अधिकार आहे असे दाखवतो. जेव्हा हे प्राणी भांडताना आवाज करतात तेव्हा घाबरुन पक्षी घाबरुन तेथून उडून जातात. याचवेळी अतिशय दुर्मिळ असा क्षण बैजू पाटील यांनी त्यांच्या कॅमेऱ्यांत टिपला आहे. त्यांच्या या दुर्मिळ छायाचित्राने त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला.