शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

भगवान महावीर जयंती बजाजनगरात उत्साहात

By admin | Published: April 20, 2016 12:29 AM

वाळूज महानगर : जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बजाजनगर व पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.

वाळूज महानगर : जगाला अहिंसा व शांतीचा संदेश देणारे भगवान महावीर यांची जयंती बजाजनगर व पंढरपूरमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली. मंगळवारी सकाळी ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आल्याने भक्तिभावाचे मंगलमय सूर ऐकू येत होते. सकल जैन समाजातर्फे सकाळी ६.३० वाजता पंढरपुरातील महावीर चौकात धर्मध्वजारोहण करून शहरातील महावीर स्तंभापर्यंत मोटारसायकल रॅली काढण्यात आली. त्यानंतर भगवान महावीर यांच्या प्रतिमेची पंढरपूर जैन स्थानक ते बजाजनगरातील महावीर भवनापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. येथील महावीर भवनात विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी भाविकांत चैतन्य व उत्साह दिसून आला. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर नवकार महामंत्र, कलशपूजन करून या कलशाची बोली लावण्यात आली. ही बोली जि.प. सदस्य अनिल चोरडिया यांनी घेतली. पंढरपूर जैन श्रावक संघातर्फे रक्तदान शिबीर, स्वच्छता अभियान व मोफत नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी रुग्णांना चष्म्यांचे मोफत वाटप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसादाने (गौतम प्रसादी) कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमास अनिल चोरडिया, श्रावक संघाचे अध्यक्ष संतोष चोरडिया, उपाध्यक्ष किशोर राका, सतीश शिंगी, अ‍ॅड. महावीर कांकरिया, पंढरपूरचे सरपंच गौतम चोपडा, चंद्रकांत चोरडिया, शशिकांत कोठारी, ग्रा.पं. सदस्य अमित चोरडिया, सुमित कुचेरिया, सागर चोरडिया, डॉ. प्रवीण तातेड, मयूर चोरडिया, गिरीश दुग्गड, प्रवीण बोरा, मिश्रीलाल चोरडिया, सुनील जैन, मनोज कटारिया, किरण नहार, नरेश ललवाणी, चेतन छाजेड, जितेंद्र बेदमुथा, मनोज मंडलेचा, रवींद्र बेदमुथा, प्रफुल्ल तातेड यांच्यासह सकल जैन बांधव-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.