शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

तहानलेल्या मराठवाड्यासाठी गोदामायने घेतली धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2019 11:49 AM

नांदूर-मधमेश्वरमधून ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

ठळक मुद्देमराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली

- अझहर शेख   

औरंगाबाद/नाशिक : मराठवाड्यात अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जायकवाडी धरणाचा पाणीसाठा खालावलेला असताना तहानलेल्या मराठवाड्यातील औरंगाबादसह अन्य जिल्ह्यांमधील नागरिकांची तहान भागविण्यासाठी पुन्हा नाशिकवरून गोदावरी, दारणा या नद्यांनी धाव घेतली आहे. 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबेकश्वर, इगतपुरी या दोन तालुक्यांत रविवारपासून जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे भावली, दारणासह गंगापूर धरणातूनही हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. यामुळे गोदा-कादवा संगमावर असलेल्या नांदूर-मधमेश्वर बंधाऱ्याचे पाचही दरवाजे मंगळवारी (दि.३०) उघडण्यात आले. हे सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने वेगाने जात आहे.रविवारपासून (दि.२८) इगतपुरीसह त्र्यंबकेश्वर तालुक्यांमध्ये जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. यामुळे इगतपुरीतील भावली धरण शंभर टक्के भरले असून, शनिवारपासून (दि.२७) ४८१ क्युसेकने त्यामधून विसर्ग सुरू करण्यात आला. तसेच दारणामधूनही १ हजार क्युसेकने विसर्गाला प्रारंभ करण्यात आला. दारणाचा साठा ८५ टक्के झाला आहे.

मंगळवारी दारणामधून १३ हजार, गंगापूर धरणातून ८ हजार ८३३ आणि भावलीमधून ९४८ क्युसेकपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे निफाड तालुक्यातील नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यातून मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ५८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदापात्रात करण्यात आला. एखाद्या समुद्राला भरती यावी आणि खवळलेल्या समुद्राच्या लाटांनी उंचच उंच उसळ्या घ्याव्या याप्रमाणे दृश्य नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यासमोर पहावयास मिळाले. प्रचंड वेगाने ५८ हजार क्युसेक (१६४ कोटी १९ लाख ८० हजार लिटर प्रति सेकंद) इतके पाणी जायकवाडीच्या दिशेने गोदापात्रातून प्रवाहित झाले आहे. दारणा, भावली गंगापूर धरणांमधून सोडण्यात आलेले पाणी नांदूरमधमेश्वर बंधाऱ्यात एकत्र येते. येथून हजारो क्युसेक पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे जायकवाडीच्या पाणीसाठ्यात निश्चितच वाढ होणार आहे.

गोदावरीने गाठली धोक्याची पातळीगोदावरीमध्ये गंगापूरमधून मंगळवारी दुपारी ८ हजार ८३३ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तसेच शहरातदेखील संततधार पहाटेपासून सुरू असल्यामुळे पंचवटी रामकुंडापासून पुढे नदीपात्रात ११ हजार २१० क्युसेक इतके पाणी नदीपात्रात प्रवाहित झाले. त्यामुळे गोदावरीने धोक्याची पातळी गाठली असून, निफाड तालुक्यातील गोदाकाठावर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गंगापूर धरणातून सायंकाळपर्यंत याच वेगाने विसर्ग सुरू होता. पाणलोटक्षेत्रात पाऊस वाढल्यास विसर्ग वाढविला जाण्याची शक्यता आहे.

टॅग्स :godavariगोदावरीJayakwadi Damजायकवाडी धरणWaterपाणीRainपाऊसMarathwadaमराठवाडा