छत्रपती संभाजीनगर : पितृपक्षात नवीन खरेदी करणे टाळले जाते. यामुळे या काळात सोन्या-चांदीचे भाव कमी होतात; आणि झालेही तसेच. मागील महिन्याच्या तुलनेत भाव कमी झाले होते; पण अचानक शनिवारी हमासने इस्त्रायलवर हल्ला केला आणि युद्ध भडकले. याचा त्वरित परिणाम थेट छत्रपती संभाजीनगरातील सोन्याच्या किमतीवर पाहण्यास मिळाला. हजार रुपयांनी सोने महागले. मात्र, युद्ध किती दिवस चालेल माहिती नसल्याने दिवाळीपर्यंत आणखी भाववाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे आताच सोने खरेदी करून घेतलेली बरी, असा सल्ला ज्वेलर्स देत आहेत.
सोन्याचा दर ५९६०० रुपयेसप्टेंबरमध्ये सोने ६१ हजार रुपये प्रति (१० ग्रॅम) विकले गेले. पितृपक्ष सुरू होताच सोन्याचे भाव कमी होऊन ५८५०० रुपयांवर घसरले. म्हणजे अडीच हजार रुपयांची घसरण झाली होती. आणखी भाव कमी होण्याची शक्यता होती; पण शनिवारी ११०० रुपये वधारून ५९६०० रुपयांवर गेले.
चांदी ६८ हजारांवरसप्टेंबर महिन्यात चांदीचे भाव ७३५०० रुपये (प्रति किलो) होते. पितृपक्ष सुरू झाल्यापासून ५५०० रुपयांनी कमी होऊन रविवारी ६८ हजार रुपये होते.
युद्धावर सोन्या-चांदीचे भाव अवलंबूनहमास व इस्त्रायलमधील युद्ध आणखी भडकले व दीर्घ काळ चालले तर त्याचा निश्चित परिणाम सोने व चांदीच्या किमतीवर होऊ शकतो. दिवाळीपर्यंत भाव वाढू शकतात. पण तेजी-मंदीत अनिश्चितता आहे.- नंदकुमार जालनावाला, ज्वेलर्स
या वर्षात असे राहिले दरमहिना सोने (प्रति १० ग्रॅम) चांदी (प्रति किलो)जानेवारी--- ५९५०० रु--- ६९००० रुमार्च--- ६१००० रु--- ७३००० रु मे---६१५०० रु---- ७६००० रुजुलै---६१००० रु---७६५०० रुसप्टेंबर--६१००० रु- ७३००० रु७ ऑक्टोबर --५८५०० रु--६९००० रु८ ऑक्टोबर ५९६०० रु---६८००० रु