लोकमत न्यूज नेटवर्कजालना : पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलाशयातून सुरु केलेल्या गाळ उपसा मोहिमेस राज्य शासनानेही स्वीकारले असून, याच धर्तीवर काही ्रदिवसांपूर्वी गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. हे घाणेवाडी जलसंरक्षण मचच्या कामाची पावती असल्याचे मत प्रख्यात उद्योजक सुनील रायठठ्ठा यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.पुणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, तेजस्वीनी संस्था आणि मुस्कान प्रबोधन मंचच्या वतीने देण्यात येणारा पर्यावरण मित्र पुरस्कार जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत रायठठ्ठा यांनी पर्यावरण संवर्धनाबाबत आपली भूमिका मांडली. काही वर्षांपूर्वी सौदी अरेबियातील एक ग्राहक आपल्या कंपनीत आला होता. तेव्हा त्याला घाणेवाडी जलाशय परिसरात भटकंती करण्यास घेऊन गेलो. तेंव्हा त्याने जाणीव करुन दिली की या धरण वा जलाशयातील गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किमत आहे. त्याचे महत्त्व कळल्यानंतर साधारणपणे पाच वर्षांपूर्वी घाणेवाडी जलसंरक्षण मंच स्थापन करुन या जलाशयातील गाळ उपसा मोहीम हाती घेण्यात आली. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांना मोफत देण्यात आला. परिणामी परिसरातील शेतीचा पोतही सुधारला आणि दुषित झालेले जलस्त्रोतही शुद्ध झाले. आगामी काळात घाणेवाडी जलाशय परिसरात वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. या माध्यमातून पर्यावरणाचा ऱ्हास थांबेल आणि वरील भागातून येणारा गाळही येऊ शकणार नाही. जलाशयाची साठवण क्षमताही वाढणार आहे. आम्हाला आजही धरणातील गाळाचे महत्त्व कळालेले नाही. ते कळलेच तरच जलस्त्रोत स्वच्छ राहतील. त्याचप्रमाणे शेतीचा पोतही निश्चितपणे सुधारण्याची संधी मिळेल, अशी भावना रायठठ्ठा यांनी व्यक्त केली.
गाळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची किंमत
By admin | Published: May 27, 2017 12:40 AM