शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

‘गोल्डन ट्रँगल’ तीन यंत्रणांच्या कचाट्यात; मराठवाड्यासाठी घोषणा केलेल्या रस्त्यांची कामे संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 6:16 PM

कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. 

ठळक मुद्दे- चौपदरीकरणाची कामे द्विपदरी 

औरंगाबाद : केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी मराठवाड्यासाठी घोषित केलेल्या सुमारे १८ हजार कोटी रुपयांच्या रस्ते विकास प्लॅनमधील सुमारे १४ हजार कोटींची कामे ‘पीडब्ल्यूडी’,‘एनएचएआय’ आणि ‘एमएसआरडीसी’कडे वर्ग केली. मात्र, ही कामे या सर्व विभागांच्या कचाट्यात अडकली आहेत. कोणती यंत्रणा कोणते काम करीत आहे, याचे उत्तर कुणीही देण्यास तयार नाही. 

चौपदरीकरणासाठी नियोजित केलेल्या रस्त्यांवर १० हजार वाहनांपेक्षा जास्त वाहतूक असूनही ते रस्ते द्विपदरी, तीनपदरी करण्यात येत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या घोषणेला २५ डिसेंबर रोजी ३ वर्षे पूर्ण झाली. सदरील कामांवर एकत्रितपणे कोणत्याही संस्थेचे नियंत्रण नसल्यामुळे कुठे काय चालले आहे, हे काही समजण्यास मार्ग नाही. गोल्डन ट्रँगल कामांच्या घोषणेनंतर वर्षभरातच त्या कामांचे तुकडे पाडण्यात आले. सीआरएफ, एनएचएआय, पीडब्ल्यूडी आणि आता एमएसआरडीसी मिळून हा दळणवळण विकास कार्यक्रम राबविण्याचे ठरले असून, सर्व कामे प्रगतिपथावर असल्याचा दावा केला जात आहे. गडकरींच्या घोषणेतील बहुतांश रस्ते द्वि आणि तीनपदरीकरणात वर्ग केली आहेत. सोलापूर ते धुळे महामार्गदेखील आणखी एक ते दीड वर्ष पूर्ण होणे शक्य नाही. एमएसआरडीसीकडे वर्ग केलेली कामे प्रगतिपथावर आहेत. एनएचएआय आणि पीडब्ल्यूडीकडील कामांबाबत काही सांगता येणार नाही, असे एमएसआरडीसी सूत्रांनी सांगितले. 

कुणीच काही सांगेना१८ हजार कोटी रुपयांच्या अनेक रस्त्यांच्या कामांंची खिचडी झाली आहे. औरंगाबाद ते फुलंब्रीमार्गे सिल्लोड ते पहूर ते जळगाव हा १५५ कि़मी.चा १५५० कोटींचा रस्ता एमएसआरडीसीच्या यादीत आहे. औरंगाबाद ते सिल्लोड ते अजिंठा ते पहूरमार्गे जामनेर ते मुक्ताईनगर हा ४०१ कि़मी. रस्ता ४ हजार १० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्या कामाचे काय झाले, हे जाहीरपणे कुणीही सांगत नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते नाशिक १८३ कि़मी. रस्ता १८३० कोटींतून होईल, असे सांगण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, माहिती नाही. औरंगाबाद ते वैजापूर ते कोपरगावमार्गे शिर्डी हा १५० कि़मी. रस्ता १५०० कोटींतून होईल, असे जाहीर करण्यात आले. औरंगाबाद ते परभणी या १२५० कोटींच्या १२५ कि़मी. रस्त्याचा आहे. हाच रस्ता खामगांव ते सांगोला यामार्गे असून ४५०० कोटींतून ४५० कि़मी. तो रस्ता करण्याचे दाखविण्यात आले. ही कामे सुरू आहेत का? हे सांगण्यास संबंधित विभाग पुढे येत नाही, तर सेना-भाजपचे लोकप्रतिनिधी गप्प आहेत.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीhighwayमहामार्गAurangabadऔरंगाबाद