छत्रपती संभाजीनगर : रामभक्त हनुमानाने आपले हृदय फाडून त्यात प्रभू श्रीरामाचे वास्तव्य असल्याचे दाखवून दिले होते. आता आधुनिक रामभक्त आपल्या हृदयावर श्रीरामाचे टॅटू साकारून आपल्या भक्तीला अधिक बळकटी देत आहेत. प्रभूच्या या टॅटूची ‘क्रेझ’ तरुणांमध्ये वाढली आहे.
अयोध्येतील श्री रामाच्या बाळरुपातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनिमित्त नुकतेच सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर व गायिका आर्या आंबेकर यांनी गायलेले ‘हृदय मे श्रीराम है, हर कंठ में श्रीराम है’ हे गाणे भक्तप्रिय झाले आहे. याच पार्श्वभूमीवर टॅटू कलाकारांकडून तरुण-तरुणी प्रभू श्रीरामचंद्राचे चित्र हातावर गोंदवून घेत आहेत. काही तरुण हृदयावर श्रीरामाच्या छायाचित्राचे टॅटू काढत आहेत तर काही तरुणी-महिला हातावर ‘जय श्रीराम’ चा जयघोष साकारत आहेत. २२ जानेवारीपर्यंत हा ट्रेंड राहील, असे टॅटू कलाकारांचे म्हणणे आहे.
दररोज २० ते २५ युवक काढता येत टॅटूशहरात श्रीराममय वातावरण तयार झाले आहे. श्रीरामाचे मंदिर उभारले जात आहे. तसेच तरुणाई आता आपल्या हृदयावर, हातावर श्रीरामाचे टॅटू काढत आहेत. एका टॅटूसाठी ३०० ते ३ हजार रुपयांपर्यंत रक्कम देत आहेत.- राम कस्तुरे, टॅटू आर्टिस्ट