शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

आनंदाची बातमी ! मराठवाड्यात औरंगाबादची भूजल पातळी सर्वाधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 6:42 PM

Aurangabad has the highest groundwater level in Marathwada जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुक्यातील ८७५ विहिरीतील पाणी पातळी तपासण्यात आली आहे

ठळक मुद्देमागील ५ वर्षांच्या तुलनेत २.०३ ने भूजल पातळी वाढली

औरंगाबाद : मागील पावसाळ्यात मराठवाड्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला होता. आता पाऊस पुरे, अशी म्हणण्याची वेळ लोकांवर आली होती. परिणामी, भूजल पातळीत वाढ झाली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक भूजल वाढल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.

प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणाने मागील जानेवारी महिन्यात मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांत ७६ तालुक्यातील ८७५ विहिरीतील पाणी पातळी तपासली. हा अहवाल समोर आला आहे. मराठवाड्यात मागील ५ वर्षांतील जानेवारी महिन्यातील भूजल पातळी ७.८९ मीटर असते. या जानेवारीत ६.६५ मीटर भूजल पातळी राहिली, म्हणजे १.०५ मीटरने भूजल पातळी मराठवाड्यात वाढली. यातही औरंगाबाद जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे २.०३ मीटर भूजल पातळी वाढली, तर सर्वात कमी भूजल पातळी लातूर जिल्ह्यात -०.४३ एवढी वाढली आहे. जालना जिल्ह्यात १.९१ मीटर, परभणी १ मीटर, हिंगोली ०.३९ मीटर, नांदेड १.६३ मीटर, उस्मानाबाद १.१९ मीटर तर बीड जिल्ह्यात ०.६६ मीटरने भूजलपातळी वाढली. परभणी, गंगाखेड, किनवट व चाकूर या तालुक्यात अन्य तालुक्यांपेक्षा कमी पाऊस झाल्याची नोंद आहे. कृषी विद्यापीठाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात १ जून ते ३० सप्टेंबरदरम्यान साधारणपणे ७२२.५ मिमी पाऊस पडतो. मात्र, मागील वर्षी सरासरीपेक्षा १६.९ टक्के अधिक पाऊस झाला. भूजलपातळी वाढली, तरी पाण्याचा अतिवापर टाळावा, पाणी जपून वापरावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

सध्या तरी नाही पाणीटंचाईमराठवाड्यात जानेवारी महिन्यात कुठेच १ मीटरपेक्षा खाली भूजल पातळी गेली नाही. यामुळे सध्या तरी पाणीटंचाईसारखी परिस्थिती नसल्याचे भूजल पातळीच्या सर्वेक्षणातून दिसून येते. मात्र, यापुढे पाण्याचा किती उपसा होतो, यावरून मार्च महिन्यात किती भूजल पातळी खाली गेली. याचा सर्वेक्षण केल्यावर उन्हाळ्यात मेपर्यंत काय परिस्थिती राहील, हे कळले.- डॉ.एम.डी. देशमुख, उपसंचालिका, प्रादेशिक उपसंचालक भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादWaterपाणीRainपाऊस