औरंगाबाद : घरांच्या वाढलेल्या किमतीमुळे दुरावलेल्या ग्राहकाला वळवण्यासाठी ‘म्हाडा’ने औरंगाबाद परिसरातील ९१७ घरांच्या किमती २० ते ४७ टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिली.
म्हाडा लवकरच ९१७ घरांची सोडत काढणार आहे. यासाठी आजपासून ऑनलाईन सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला. त्यात तिसगाव १६९, वाळूज एमआयडीसी येथे २४९घरे, एमआयडीसी पैठण येथील ९५ आणि देवळाई येथील ४०४ घरांचा समावेश आहे. या सोडतीमधील घरांच्या किमती २० ते ४७ टक्क्यांनी कमी करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.
गेल्या काही वर्षांत ‘म्हाडा’च्या घरांच्या किमती वाढल्यामुळे ती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेली आहेत. त्यामुळे ‘म्हाडा’ने घरांच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.मध्यम उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गट यांच्यासाठीच्या घरांच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, शिवसेनेचे अंबादास दानवे यांची उपस्थिती होती.
पहा व्हिडिओ :