शिरूर अनंतपाळ : पुढील महिन्यात विवाह तिथी नाहीत़ शिवाय, मे महिन्यातील पाणीटंचाई अकल्पनीय आहे़ त्यामुळे सध्या विवाह सोहळे सुरु आहेत़ परंतु, या विवाह सोहळ्यांना वाढत्या तापमानाचा फटका बसत आहे़ त्यामुळे दुपारच्यावेळी होणारे हे सोहळे गोरज मुहूर्तावर करण्यास पसंती दिली जात आहे़ दुपारचे विवाह सोहळे रात्रीच्या चांदण्यात होत आहेत़दुष्काळी परिस्थितीमुळे भिषण परिस्थिती होत आहे़ तापमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचत आहे़ त्यामुळे अबालवृद्धांना उष्माघाताचा धोका वाढला आहे़ दुपारच्या वेळी होणारे शुभकार्य करणे कठीण झाले आहे़ वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे ग्रामीण भागातील विवाह सोहळे गोरज मुहुर्तावर होत आहेत़(वार्ताहर)पूर्वी शहरातील गार्डनमध्ये ‘गोरज’ मुहूर्तावर कार्यक्रम घेतले जात असत़ कारण मंगल कार्यालयावरील आकर्षक विद्युत रोषणाई रात्रीच्या वेळी अधिकच खुलून दिसत असे़ त्यामुळे गोरज मुहूर्त सर्वांनाच आवडतो़ परंतू, सध्या सूर्य आग ओकत असल्याने सर्वांनाच गोरज मुहूर्त पसंत पडत आहे़ दरम्यान गोरज मुहूर्ताचा दुसरा फायदा म्हणजे, सभा मंडपावर होणाऱ्या खर्चाची बचत होत आहे़ शिवाय उन्हाच्या तडाख्यापासून बचावही होतो़
उन्हाच्या तडाख्यामुळे ‘गोरज’ मुहूर्तास पसंती
By admin | Published: April 23, 2016 11:40 PM