शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

यावर्षी नापास झालो; पुढच्या वर्षी नक्कीच पास होऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 8:02 PM

 पुढच्या वर्षी पहिल्या दहामध्ये येऊ

ठळक मुद्देस्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात रँक घसरलारस्त्यांवर कचरा नाही; पण प्रक्रिया शून्य

औरंगाबाद : स्वच्छ भारत अभियान सर्वेक्षणात औरंगाबाद शहराचा क्रमांक १२८ वरून २२० वर आला. यावर्षी महापालिका नापास झाली असली तरी पुढच्या वर्षी पास होऊ, असा दुर्दम्य आत्मविश्वास महापालिका सत्ताधाऱ्यांनी गुरुवारी व्यक्त केला. १२८ वरून थेट २२० व्या क्रमांकावर शहर जाण्यास कोणते घटक कारणीभूत आहेत, याची कारणमीमांसा करण्याबाबत मात्र सत्ताधारी, प्रशासनाने कोणताही निर्णय अजून तरी घेतलेला नाही. 

१६ फेबु्रवारी २०१८ ते आजवर कचराकोंडीचा आढावा घेतल्यास पालिकेतील राजकीय आणि प्रशासकीय यंत्रणेतील बेबनाव याला जबाबदार असल्याचे दिसते. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीनेदेखील कचराकोंडीकडे गांभीर्याने पाहिले नसल्याचे दिसते. ९ मार्च २०१८ रोजी नगरविकास प्रधान सचिवांनी कचराकोंडी फोडण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केला. कचरा निर्मूलनात यशस्वी काम करणाऱ्या नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना येथे नियुक्त केले. वर्षभरात पालिका प्रशासनाने ज्या गतीने काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यात अनेक अडथळे आले. परिणामी शहराचा रँक घसरला आहे. 

या सगळ्या पिछाडीबाबत बोलताना महापौर नंदकुमार घोडेले म्हणाले, शहराची कचराकोंडी सोडण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याने प्रक्रिया प्रकल्प उभारले जात आहेत. येत्या तीन महिन्यांत कचऱ्यावर प्रक्रिया सुरू होईल. यावर्षी क्रमांक मागे आला असला तरी नागरिकांनी नाराज होऊ नये. कचरा संकलन व वाहतुकीचे काम सुरू झाले आहे. वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी मिळालेला ७.५० कोटींचा निधी पडून आहे. त्यामध्ये मनपाला गुण मिळाले नाही. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांनी चांगले मत नोंदविले आहे. प्रत्यक्षात पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नसून रस्त्यावर कुठेही कचरा दिसून येत नाही. नागरिकांना सोबत घेऊन पुढच्या वर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत देशात पहिल्या दहामध्ये औरंगाबाद शहर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

रँक घसरताच आढावा आणि दावे...१५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करणारे मशीन मार्चअखेरपर्यंत बसवून एप्रिलपासून त्यावर प्रक्रिया सुरू केली जाईल, असा दावा महापौरांनी केला. प्रशासनाने प्रक्रिया केंद्राच्या कामाचा आढावा घेतला. मनपाने चिकलठाणा, हर्सूल, पडेगाव आणि कांचनवाडी येथे कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी शेड उभारण्याचे काम सुरू आहे. एप्रिल महिन्यात कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचा दावा सत्ताधाऱ्यांनी केला. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कचरा साचून राहणार नाही. सुक्या कचऱ्याचे बेलिंग केले जात असल्याने कचरा कंपन्या घेऊन जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन कक्षप्रमुख नंदकिशोर भोंबे यांनी दिली. कांचनवाडी येथे कचऱ्यापासून येत्या तीन महिन्यांत गॅसनिर्मिती केली जाणार आहे. सध्या तेथील कचऱ्यावर बायोकल्चर प्रक्रिया करण्यात येत आहे. हर्सूल येथे ओपन टेक्नॉलॉजीद्वारे कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी गुरुवारी निविदा उघडण्यात आली. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्न