वाळूज महानगर : पाटोदा येथे ग्रामपंचायतीच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात २५ व्यक्तींना ग्रामभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
अध्यक्षस्थानी सरपंच भास्कर पा.पेरे तर प्रमूख पाहुणे म्हणून पोलीस महानिरीक्षक सिंघल, बजाज आॅटोचे सी.पी.त्रिपाठी, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र पेरे गुरुजी, जि.प.सदस्य रमेश गायकवाड, पंचायत समिती सदस्य अनुराग शिंदे, शशिकला पेरे, उपसरपंच विष्णू राऊत, ग्रामविकास अधिकारी पी.एस.पाटील उपस्थित होते. यावेळी गावाच्या विकासात योगदान देणाऱ्या २५ व्यक्तींना ग्रामभुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. गावातील शेवंताबाई गायकवाड यांनी कर्ज काढुन सर्वप्रथम स्वच्छतागृह उभारल्याने त्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात सरपंच भास्कर पेरे यांनी गावांच्या विकासासाठी महत्वपुर्ण योगदान देणारे स्व.दिलीप पा.पेरे, स्व.ग्रामविकास अधिकारी बी.एम.पाटील यांच्या कार्याचा गौरव करुन त्यांच्या प्रयत्नामुळेच गाव विकासात अग्रेसर झाल्याचे सांगितले. यावेळी जि.प.शाळेच्या विद्यार्थिनी संजना संतोष भुजंग व अमृता बाळु पवार लिखित ‘आदर्श गाव पाटोदा’ या कविता सग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमात ग्रामपंचायतीचा नियमितपणे कर भरणाºया १५० पैकी २५ भाग्यवान करदात्यांचा लकी ड्राची सोडत काढुन संसारोपयोगी भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिपाली पेरे यांनी केले. प्रास्ताविक सरपंच भास्कर पा.पेरे तर आभार देवचंद पेरे यांनी मानले. कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य कल्याण पेरे, पुनम गाडेकर,संगिता जमधडे,वर्षा भाग्यवंत, पुष्पा पेरे, मिराबाई पवार,चंदनसिंग महेर, कृष्णा पेरे, कसुमबाई मातकर आदीसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.