- संतोष हिरेमठऔरंगाबाद, दि. 21 : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणारे शासकीय कर्करोग रुग्णालय आता सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. गेल्या पाच वर्षाच्या कालावधीत हजारो रुग्णांना येथील उपचारामुळे नवीन आयुष्य मिळाले आहे.
कर्करोग रुग्णालय २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. घाटी रुग्णालयातील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार होत असताना रुग्णांसोबत अनेकदा त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथवर थांबलेले दिसत. कॅन्सर रुग्णांसाठी शासन स्तरावर केवळ मुंबईमध्ये रुग्णालय होते. त्यामुळे मुंबई गाठण्याची वेळ गोरगरीब रुग्णांवर येत होती.
कॅन्सरच्या रुग्णांसाठी स्वतंत्र शासकीय कर्करोग रुग्णालय औरंगाबादेत उभारावे, यासाठी ‘लोकमत’चे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आणि मंजूर करुन घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदानासमोरील जागाही मिळवून दिली. २००८ मध्ये रुग्णालयाला मंजूरी मिळाली आणि २१ सप्टेंबर २०१२ रोजी हे रुग्णालय रुग्णसेवेत दाखल झाले. औरंगाबादेत कर्करोग रुग्णालय सुरु झाले आणि रुग्णांसाठी ते आता आशेचा किरण ठरत आहे. कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी रुग्ण या रुग्णालयाला प्राधान्य देत आहेत. या ठिकाणी
मराठवाड्यातील ८ जिल्हे, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, आकोला, अहमदनगर, जळगाव,नाशिक तसेच अन्य राज्यांधूनही रुग्ण येतात. विदेशी रुग्णही उपचारासाठी येतात. कर्करोग रुग्णालयामध्ये रुग्णांची गर्दी वाढत आहे. या रुग्णालयात टाटा हॉस्पिटलच्या माध्यमातूनच मिळालेले भाभाट्रॉन-२ हे विशेष यंत्र स्थापित करण्यात येत आहे. रेडिओथेरपी विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
पायाभूत सुविधांनी सुसज्जकर्करोग रुग्णालयास राज्य कर्करोग संस्थेचा दर्जा मिळाला आहे. या अंतर्गत केंद्र सरकारचा ४३ कोटी रुपये अनुदानाचा पहिला हप्ता मिळाला आहे. केंद्र सरकारच्या निधीमुळे आगामी दोन वर्षांत अत्याधुनिक प्रयोगशाळा, रक्तपेढी डॉक्टर, तंत्रज्ञ, निवासी डॉक्टर, आवश्यक मनुष्यबळ, अत्याधुनिक उपचार आणि पायाभूत सुविधांनी सुसज्ज होणार आहे.
देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मानशासकीय वैद्यकीय महाविद्यालयास संलग्न आणि वैद्यकीय महाविद्यालयाने चालविलेल्या देशातील पहिल्या कर्करोग रुग्णालयाचा मानही औरंगाबादच्या कर्करोग रुग्णालयास मिळाला आहे.
आकडेवारीत संस्थेचा आढावा : 21 सप्टेंबर 2012 ते 31 ऑगस्ट 2017बाह्यरुग्ण विभाग - 1 लाख 44 हजार 505आंतररुग्ण विभाग - 16 हजार 102लिनिअर एस्केलेटर - 3 हजार 787कोबाल्ट युनिट - 1 हजार 422ब्रेकी थेरपी - 1 हजार 227डे केअर केमोथेरपी - 27 हजार 853मोठ्या शस्त्रक्रिया - 2 हजार 601छोट्या शस्त्रक्रिया - 2 हजार 167
तपासण्या : मायक्रोबायोलॉजी - 9 हजार 305पैथोलॉजी - 1 लाख 13 हजार 783बायोकेमिस्ट्री - 4 लाख 58 हजार 329