शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

शिवाजी प्राथमिक शाळेकडून शासनाची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 11:29 PM

खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याचेही अहवालात स्पष्ट केले.

ठळक मुद्देशिक्षणाधिकाऱ्यांनी तयार केला अहवाल : पदमान्यता कायम राखण्यासाठीच पटसंख्येची बनवाबनवी

औरंगाबाद : खोकडपुरा येथील श्री शिवाजी प्राथमिकशाळेने संचमान्यता कायम राहून शिक्षकांची पदे टिकावीत, यासाठीच बनावट पटसंख्या दाखविल्याचा निष्कर्ष जि. प. च्या प्राथमिक शिक्षण विभागाने काढला आहे. तसेच वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान घेऊन शासनाची फसवणूक केल्याचेही अहवालात स्पष्ट केले. माध्यमिक शिक्षण विभागाने माध्यमिक शाळेच्या बनवाबनवीचा अहवाल तयार केला आहे.श्री शिवाजी  मोफत एज्युकेशन सोसायटी, कंधार संचलित खोकडपुरा येथील शिवाजी प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांना गोवर-रुबेला लस देण्यासाठी सोमवारी (दि.३) रांजणगाव येथून एकाच बसमध्ये १२२ विद्यार्थ्यांना आणले होते. या बसला अपघात झाल्यामुळे शाळेची बनवेगिरी समोर आली. ४ डिसेंबर रोजी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल आणि माध्यमिकचे डॉ. बी.बी. चव्हाण यांनी भेट देत शाळेची झाडाझडती घेतली होती. यात धक्कादायक माहिती मिळाली. प्राथमिक शाळेच्या पहिली ते चौथीच्या एकूण १२ तुकड्या आहेत. यात ३ डिसेंबर रोजी एकूण ३५२ पैकी २३० विद्यार्थी उपस्थित दाखविले आहे, तर ४ डिसेंबर रोजीच्या पाहणीत शाळेत केवळ २२ विद्यार्थीच आढळून आले. यातील २७४ विद्यार्थ्यांचे रहिवासी पत्ते हे रांजणगाव परिसरातील आहेत. प्राथमिक शाळेत १४ शिक्षक कार्यरत असून, त्यातील दोन शिक्षक विनाअनुदानित आहेत. त्यांना मान्यता देण्यात आलेली नाही, असेही प्राथमिकच्या अहवालात म्हटले आहे. माध्यमिक शिक्षण विभागानेही शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचा अहवाल तयार केल्याची माहिती शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी.चव्हाण यांनी दिली.प्राथमिक शाळेतील त्रुटी- शालेय परिवहन समितीची स्थापना नाही- शालेय व्यवस्थापन समितीचे अभिलेखे उपलब्ध नाहीत.- शाळेने पालक सभा घेतलेली नाही.- पालकांना विद्यार्थ्यांच्या स्थलांतराबाबत लेखी सूचना दिलेल्या नाहीत.- पाठ्यपुस्तकांचे योग्यपणे वाटप नाही.-क्रीडा, अध्ययन, अध्यापन साहित्य उपलब्ध नाही.- ग्रंथालय नोंदवहीवर १४४ पुस्तके पण विद्यार्थ्यांना एकही दिलेले नाही.-१ लाख ६० हजार ८१८ रुपयांचे वेतनेतर अनुदान खर्चाबाबत अभिलेख तपासणीसाठी उपलब्ध करून दिले नाही.प्राथमिक शिक्षण विभागाने काढलेले निष्कर्ष- खोकडपुरा येथील प्राथमिक शाळेत रांजणगाव, ता. गंगापूरयेथील २७४ विद्यार्थ्यांची नोंद.- औरंगाबादेतील ७७ विद्यार्थी असून, तपासणीत २२ विद्यार्थीच हजर.- शिवाजी प्राथमिक व माध्यमिक शाळा एकाच इमारतीत दोन सत्रात भरवतात. इमारतीची मालकी माध्यमिककडे.- पहिली ते चौथीच्या प्रत्येकी ३ तुकड्या. प्रत्यक्षात प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थी हजेरी पट तपासणीसाठी उपलब्ध. तिसºया तुकडीचे हजेरीपटच उपलब्ध नाही.- शाळेने संचमान्यतेमध्ये शिक्षकांची पदे टिकविण्यासाठीच पटसंख्या खोटी दर्शविली.- वेतन अनुदान, वेतनेतर अनुदान, शालेय पोषण आहार, मोफत पाठ्यपुस्तक आणि सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त अनुदान लाभ घेऊन शासनाची फसवणूक़--शाळेची मान्यता रद्दची शिफारस होणारश्री शिवाजी हायस्कूलमधील प्राथमिक आणि माध्यमिक अशा दोन्ही शाळांची मान्यता रद्द करावी, अशी शिफारस शिक्षण संचालकांना केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागातील अधिकाºयांनी दिली. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण म्हणाले, माध्यमिकचा अहवाल तयार केला आहे. त्याआधारे मान्यता रद्द करण्याची शिफारस येत्या दोन दिवसांत केली जाईल. प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल म्हणाले, अहवाल अंतिम केला आहे. येत्या दोन दिवसांत शाळेची मान्यता रद्दचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येईल.

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षणAurangabadऔरंगाबाद