पैठण (औरंगाबाद ) : भाजपा-शिवसेनेला सरकार चालवता येत नाही, हे सरकार नापास झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता अभ्यास बंद करावा असा टोला माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी लगावला. ते पैठण येथे दुष्काळ मोर्चात बोलत होते.
आज दुपारी कॉंग्रेसतर्फे दुष्काळ मोर्चा काढण्यात आला. शहरातील खंडोबा चौकातून मोर्चास प्रारंभ करण्यात आला. यानंतर मोर्चाचे शिवाजी चौकात जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले, भाजप सरकार जनतेला काही देऊ शकत नाही. पुन्हा हे सरकार आले तर तुमचा मतदानाचा अधिकार सुद्धा हिरावला जाईल. तसेच सरकारचा मराठवाड्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन उदासीन असून आम्ही मंजूर केलेल्या योजना सुद्धा त्यांनी राबविल्या नाहीत, असेही ते म्हणाले.
यावेळी खा. एकनाथ गायकवाड, जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार, नामदेव पवार, रविंद्र काळे, जितसिंग करकोटक, तालुकाध्यक्ष विनोद तांबे, माजी मंत्री अनिल पटेल, विलास औताडे, आप्पासाहेब पाटील, किशोर दसपुते, प्रल्हाद राठोड, रावसाहेब नाडे, किरण डोणगावकर, शेषराव तायडे, निमेश पटेल, हसनोद्दीन कटयारे, जालिंदर आडसूळ, अजित पगारे, फाजल टेकडी, रफिक कादरी आदींची उपस्थिती होती. या वेळी जि प सदस्य पल्लवी नवथर, सविता पवार, मंगल नवले, तय्यब पटेल, आंबादास ढवले, सोमनाथ भारतवाले, हमीद सर , दिलीप सोनटक्के, महेश पवार, किरण जाधव, युवराज करकोटक, तुळशीदास शिंदे, दत्ता फासाटे, रमजु चारनिया, हरिपंडीत गोसावी भिकाजी आठवले, रामनाथ चोरमले यांच्यासह मोठ्याप्रमाणावर शेतकऱ्यांचा सहभाग होता. सभेनंतर तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.