शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

बदली होऊनही सोडवेना शासकीय निवासस्थाने

By admin | Published: January 15, 2017 10:58 PM

बीड येथील जिल्हा रुग्णालयाच्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाची निवासस्थाने आहेत.

व्यंकटेश वैष्णव बीडयेथील जिल्हा रुग्णालयाच्या द्वितीय व तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विभागाची निवासस्थाने आहेत. मागील तीन वर्षांपासून बदली झालेली असतानादेखील काही कर्मचारी शासकीय निवासस्थान सोडत नसल्याने नव्याने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी निवासस्थाने मिळत नाहीत. परिणामी नव्याने बीडला बदलून आलेल्या कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.येथील जिल्हा रुग्णालयांतर्गत एकूण ३६ शासकीय निवासस्थाने आहेत. बाहेरून आलेल्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळावी या उद्देशाने आरोग्य विभागाने निवासस्थाने बांधली आहेत. याशिवाय तृतीय व चतुर्थ श्रेणीतील कर्मचाऱ्यांना रात्री-अपरात्री जिल्हा रुग्णालयात कर्तव्य बजावावे लागत आहे. अशा परिस्थितीत कर्तव्य बजावून घरी जाण्यासाठी सुरक्षित राहावे हा उद्देश यामागे आहे. मात्र, जुन्या कर्मचाऱ्यांकडून शासकीय निवासस्थाने सोडली जात नसल्याने नवीन येणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय घरे मिळत नाहीत.चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सचिन नांदूरकर यांना तृतीय श्रेणीतील कर्मचाऱ्यांचे निवासस्थान मागील अनेक वर्षांपासून दिलेले आहे. याला आरोग्य विभागातील संबंधित कर्मचाऱ्याने दुजोरा दिला आहे. जेव्हा शासकीय निवासस्थाने रिकामी होती, तेव्हा दिलेली आहेत, आता ती निवासस्थाने परत घेतली जातील, असेही संबंधित कर्मचाऱ्याचे म्हणणे आहे.