शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

आरक्षणासंबंधी सरकारने तातडीने सकारात्मक पाऊल उचलावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2018 12:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट ...

ठळक मुद्देकालबद्ध कार्यक्रमाची मागणी : मराठा समाजातील युवकांनी आत्महत्या, जाळपोळ थांबविण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांवरून राज्यभर पेटलेले आंदोलन आता आवाक्याबाहेर गेल्यामुळे राज्यभरातील सर्व संघटनांची मोट बांधून शांततेच्या मार्गाने लढा देण्यासाठी व्यापक बैठक घेण्याचा निर्णय सेवानिवृत्त न्यायमूर्ती बी.एन. देशमुख यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. समाजातील युवकांनी आत्महत्या करू नये, तसेच जाळपोळ तथा हिंसाचार करणाऱ्या घटनांंत पुढाकार घेऊ नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. राज्यव्यापी बैठक न्या. देशमुख यांच्या उपस्थितीत औरंगाबादलाच होईल, तिची तारीख व ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल, असे उद्योजक मानसिंग पवार यांनी जाहीर केले.राज्यभरातील समाजातील ज्येष्ठ मान्यवर व संघटनांच्या नेत्यांना बोलावून त्या बैठकीत सरकार व समाजाला मार्गदर्शन करणारा व्यापक विचार पुढे यावा, असे न्या. देशमुख यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत ठरले.सेवानिवृत्त न्यायमूर्ती देशमुख म्हणाले की, गेली अनेक वर्षे अहिंसेच्या मार्गानेच आंदोलने सुरू होती. मागील दोन वर्षेदेखील समाजाने शांततेने काढण्यात आलेल्या मोर्चातून ऐतिहासिक संदेश दिला. असे असताना सरकार काहीही निर्णय घेत नसल्यामुळे समाजाच्या शांततेचा संयम सुटला आहे. त्यामुळे समाजाला शांततेचे आवाहन करणे आवाक्याबाहेर झाले आहे. यासाठी सरकारने तातडीने आरक्षण व इतर मागण्यांबाबत सकारात्मक पाऊल उचलून कालबद्ध कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. शासनाने सकारात्मक पाऊल उचलले, तर समाजाला शांततेचे आवाहन करण्यास बळ मिळेल. महाराष्ट्र पेटलेला असताना केंद्रीय नेतृत्व यावर काहीही बोलत नाही, असा मुद्दा उपस्थित करीत न्या. देशमुख म्हणाले की, आंदोलन तीव्र असावे; परंतु जाळपोळ, दहशत, आत्महत्येसारखे प्रकार नसावेत. सरकारवर दबाव वाढला पाहिजे; पण त्यात हिंसा नसावी. आज सरकार पोलिसांवर भिस्त ठेवून आहे. उद्या सरकार सैन्याचा किंवा शस्त्रसंधीचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करील. समाजाने हिंसा करून सरकारला तसे करण्यासाठी पूरक ठरू नये. सरकारला हे करणे तेवढे सोपे नाही; परंतु तसे पाऊल सरकारने उचलले, तर समाजातील तरुणांचे नुकसान होईल.औरंगाबाद शहरात मे महिन्यात दंगल झाली. त्यानंतर कचरा प्रश्नामुळे शहर पेटले. आता या आंदोलनामुळे शहर धुमसत आहे. या सगळ्या घटनांचा परिणाम उद्योग, शहर, समाज आणि विभागाच्या विकासावर होतो आहे. ४ युवकांनी आत्महत्या केली आहे. आंदोलकांना विनंती आहे की, त्यांनी जाळपोळ, हिंसेऐवजी अहिंसेने हे आंदोलन पुढे न्यावे, असे उद्योजक पवार यांनी नमूद केले.बैठकीला रमेश गायकवाड, प्रमोद खैरनार, प्रदीप पाटील, साकेत भांड, विवेक भोसले, जयराज पाथ्रीकर, सुभाष शेळके, औताडे यांची उपस्थिती होती. उद्योजक पद्माकर मुळे, ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे आणि एमजीएमचे विश्वस्त अंकुशराव कदम हेदेखील बैठकीला येणार होते; परंतु काही कामामुळे त्यांनी समन्वयकांशी चर्चा करून येणार नसल्याचे सांगितले. या बैठकीला मराठा समाजासाठी विविध माध्यमांतून काम करणाºया संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.बैठकीत अनेकांनी मांडल्या सूचनाया बैठकीला प्रा. प्रतापराव बोराडे, उद्योजक मानसिंग पवार, बी.एस. खोसे, प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे यांनी विविध सूचना करून प्रस्ताव मांडले. मोठ्या मेहनतीने उभ्या केलेल्या आंदोलनात फूट पाडण्याचेदेखील प्रयत्न होत आहेत. त्यामुळे समाजमनावर त्याचे परिणाम होत असून, त्याचा भडका आंदोलनाला हिंसक वळण लागण्यातून उडतो आहे. समाजाला आंदोलन परवडणारे नाही, तसेच युवकांच्या आत्महत्यांनीदेखील प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्न वाढतील, असे प्रा. भराट म्हणाले. वाकडे म्हणाले की, जिल्हानिहाय संघटनांची राज्यव्यापी बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले जावे. खोसे म्हणाले की, कालबद्ध कार्यक्रम राबविणे आणि मेगा भरतीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने तातडीने घेतला पाहिजे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन