औरंगाबाद : शासनाचा २0१५-१६ आणि २0१६-१७ या वर्षासाठी जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार विजेत्यास १0 हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पुरस्कार विजेत्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात येणार आहे.पुरस्कारर्थींची यादी (२0१५-१६) : गुणवंत खेळाडू - सूरज ताकसांडे (जिम्नॅस्टिक), २. शीतल मुळे (तलवारबाजी), धर्मेंद्र काळे (आट्या-पाट्या), गुणवंत क्रीडा संघटक : प्रा. एकनाथ साळुंके (हॅण्डबॉल). २0१६-१७ (गुणवंत खेळाडू) : हर्षदा निठवे (नेमबाजी), दुर्गेश जहागीरदार (तलवारबाजी), तुषार आहेर (तलवारबाजी), अंतरा हिरे (तायक्वांदो), क्रीडा मार्गदर्शक : सतीश इंगळे (नेटबॉल), गुणवंत क्रीडा संघटक : डॉ. फुलचंद सलामपुरे (कुस्ती व इतर).शासनाचे युवा पुरस्कारही जाहीर झाले आहेत. शासन निर्णयानुसार जिल्ह्यात, राज्यात सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवक-युवती व संस्थांना जिल्हास्तरावर पुरस्कार दिला जातो.जिल्हा युवा पुरस्कारार्थी (२0१५-१६). : युवक : स्वप्नील चंदने, युवती : कोमल प्रधान, युवक संस्था : जय विश्वकर्मा सर्वोदय शिक्षण संस्था). २0१६-१७ : युवक : सुमित धुमाळ, युवती : सारिका पाटील, युवक संस्था : नारायणा व्यायामशाळा व क्रीडा मंडळ, औरंगाबाद). २0१७-१८ : युवक : विवेक खराटे, युवती : पूजा गायकवाड. युवक संस्था : चंदन युवक शिक्षण व्यायाम विकास क्रीडा मंडळ, औरंगाबाद.
शासनाचे जिल्हा क्रीडा पुरस्कार जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2018 12:26 AM