शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

पदवीधरच्या प्रचारातोफा चिखलफेकीने थंडावल्या

By | Published: December 02, 2020 4:08 AM

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. रणधुमाळीचा शेवटचा दिवस बहुतांश उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय ...

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या प्रचार तोफा रविवारी सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. रणधुमाळीचा शेवटचा दिवस बहुतांश उमेदवारांनी एकमेकांवर राजकीय चिखलफेक करीत गाजविला. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी, आम आदमी पार्टीसह अपक्ष उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. शेवटच्या दिवशी जोरदार आरोप-प्रत्यारोप करीत प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी ‘मीच’ निवडून येणार असल्याचा दावा केला. ३५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात असून, रविवारी सायंकाळी ५ वाजेनंतर प्रशासनाच्या ताब्यात सगळी यंत्रणा गेली असून, आचारसंहिता कक्षाची सर्व उमेदवारांवर करडी नजर राहणार आहे. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ या वेळेत मतदान होणार आहे.

३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार

मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३ लाख ७३ हजार १६६ पदवीधर मतदार असून, त्यात पुरुष पदवीधर मतदार २ लाख ८६ हजार २४९, तर महिला पदवीधर ८६ हजार ९०९ आहे. एकूण मतदारांच्या तुलनेत सुमारे २५ टक्के महिला मतदारांचे प्रमाण आहे. विभागात एकूण ९३७ सूक्ष्म निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आली आहे. सर्वाधिक १ लाख ६३ हजार ७९ पदवीधर मतदार संख्या औरंगाबाद जिल्ह्याची आहे. जालना २९ हजार ७६५, परभणी ३२ हजार ७१५, हिंगोलीत १६ हजार ७९४, नांदेड ४९ हजार २८५, बीड ६३ हजार ४३६, लातूर ४१ हजार १९०, उस्मानाबाद ३३ हजार ६३२ इतकी आहे. औरंगाबााद विभागात एकूण ८१३ मतदान केंद्रे आहेत. औरंगाबाद २०६, जालना ७४, परभणी ७८, हिंगोली ३९, नांदेड १२३, लातूर ८८, उस्मानाबाद ७४, तर बीडमध्ये १३१ मतदान केंद्रे आहेत.

या पुराव्यांआधारे मतदान शक्य

आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड, पारपत्र, केंद्र-राज्य शासन, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज संस्था किंवा खाजगी उद्योगांनी वितरित केलेले सेवा ओळखपत्र लोकप्रतिनिधींचे अधिकृत ओळखपत्र, शिक्षकांना दिलेले ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे पदवी-पदविका मूळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरित केलेले अपंगत्वाचे मूळ प्रमाणपत्र आदी मतदार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.