शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

पदवीधर निवडणूक : औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात ९ टक्के मतदान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:43 PM

जिल्ह्यात एकूण १लाख ६ हजार ३७९ मतदार आहेत.

ठळक मुद्देजिल्ह्यात ७४९५९ पुरुष, ३१४१५ महिला मतदारजिल्ह्यात २०६ मतदान केंद्रे, तर शहरात ११७ मतदान केंद्रे

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी ८ वाजल्यापासून मतदान सुरु झाले आहे. सकाळी १० वाजेपर्यंत जिल्ह्यात ९.२७ टक्के मतदान झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात एकूण ७४९५९ पुरुष, ३१४१५ महिला मतदार आहेत. जिल्ह्यात २०६ मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक ११७ मतदान केंद्रे शहरात आहेत. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदारांना केंद्रांपर्यंत आणणे उमेदवारांसाठी आव्हान आहे. जिल्ह्यात एकूण १८१ टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. तर सकाळी पहिल्या दोन तासात  एकूण ९. २७ टक्के मतदान जिल्ह्यात झाले. जिल्ह्यात एकूण १लाख ६ हजार ३७९ मतदार आहेत. त्यात ५ मतदार तृतीयपंथी आहेत. सर्वाधिक ११७ मतदान केंद्रे औरंगाबाद तालुक्यात आहेत. सर्वात कमी प्रत्येकी ५ मतदान केंद्रे खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात आहेत. सिल्लोडमध्ये १५, कन्नड १४, फुलंब्री ६, पैठण १५, गंगापूर १४ आणि  वैजापूर १५ अशी एकूण २०६ मतदान केंद्रे आहेत. 

८० रुग्णवाहिका उपलब्ध कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता तालुकानिहाय आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचारी  उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये जिल्ह्यात मतदान प्रक्रियेसाठी १०४ अधिकारी, २०६ कर्मचारी, जिल्हा कोविड आरोग्य केंद्र, जिल्हा कोविड रुग्णालय आणि कोविड केअर सेंटरमध्ये एकूण ९९ अधिकारी आणि एकूण ८० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबादElectionनिवडणूक