जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत १५ प्रकरणे पात्र
औरंगाबाद : जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत शेतकरी आत्महत्येची १५ प्रकरणे पात्र ठरविण्यात आली. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकरी आत्महत्येबाबत जिल्हास्तरीय समितीची बैठक पार पडली. बैठकीला जि.प. सीईओ डॉ. मंगेश गोंदावले, सहायक पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे आदींची उपस्थिती होती. बैठकीत दाखल झालेल्या एकूण १७ प्रकरणांवर चर्चा झाली, तसेच १५ प्रकरणांना पात्र ठरवून त्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे निर्देश चव्हाण यांनी संबंधितांना दिले.
पाकिस्तानी नागरिकाला भारतीय नागरिकत्व
औरंगाबाद : पाकिस्तानी नागरिक राकेश कुमार यांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी २३ रोजी एकनिष्ठतेची शपथ देऊन भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. राज्य शासनाच्या गृहविभागाच्या पत्रान्वये राकेश कुमार यांच्या ऑनलाईन प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली आहे. त्यांना नागरिकत्व कायदा १९५५ च्या कलम ६ (१) अंतर्गत नागरिकत्व देण्यात आले.