शहरं
Join us  
Trending Stories
1
"रामराजेंनी मला फोन केला, उद्या त्यांच्याशी..."; अजित पवारांनी सोडलं मौन
2
"महाराष्ट्रात 'खोके आणि धोके' सरकार"; प्रियंका गांधींचं टीकास्त्र, व्हिडीओ केला शेअर
3
PM नरेंद्र मोदींची घटनात्मक पदावर २३ वर्षे पूर्ण, २००१ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले!
4
अकोल्यात किरकोळ कारणांवरून दोन गटात वाद, हरिहर पेठ येथे दगडफेक, तणावपूर्व परिस्थिती
5
 उद्धव ठाकरेंची कार्यशैली म्हणजे ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’, श्रीकांत शिंदेंची टीका
6
"महत्वाच्या टप्प्यावर पोहोचले युद्ध!", इकडे झेलेंस्कींनी घोषणा केली; तिकडे युक्रेननं रशियाचा तेल डेपो उडवला!
7
इस्रायलवर दुहेरी वार! हिज्बुल्ला अन् हमासने एकत्रितपणे केला मिसाईल हल्ला; अनेक जण जखमी
8
मुंबई लुटतच नाहीत तर फुकटात द्यायचं काम होतंय; आदित्य ठाकरेंचा CM शिंदेंवर गंभीर आरोप
9
माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात महाराष्ट्राला मोठे यश; मुख्यमंत्री शिंदेंचा दावा
10
धक्कादायक! हिमाचल प्रदेशमध्ये चीनने पाठवले ड्रोन, भारताच्या हद्दीत हेरगिरीचा प्रयत्न?    
11
रिओ ऑलिम्पिकचे पदक थोडक्यात हुकलेली जिम्नॅस्ट दीपा कर्माकरची ३१व्या वर्षी निवृत्तीची घोषणा
12
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
13
"...म्हणून पांडुरंगाने ते (घड्याळ) काढून घेतलं"; इंदापुरात सुप्रिया सुळेंनी काय सांगितलं?
14
पाक शान-शफिकची जोडी जमली; पण सचिन-सेहवागच्या रेकॉर्ड पर्यंत नाही पोहचली
15
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
16
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
17
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
18
900% पर्यंत खटा-खट परतावा देणारे शेअर धडा-धड आपटले! 6 महिन्यात नाव बुडाली, लोकांवर डोक्याला हात लावायची वेळ आली
19
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
20
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड

दहावी, बारावीत ५० टक्के गुणांची अट; मुक्त विद्यापीठाच्या पदवीधारकांना ‘स्वाधार’ मिळेना

By विजय सरवदे | Published: January 31, 2024 1:08 PM

नियमानुसार ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे.

छत्रपती संभाजीनगर : दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० टक्के किंवा त्याहून अधिक गुण असलेल्या विद्यार्थ्यांनाच ‘स्वाधार’ शिष्यवृत्ती देण्याचा नियम आहे. मुक्त विद्यापीठाचे काही पदवीधारक या नियमात बसत नसल्यामुळे समाजकल्याण विभागाने त्यांना अपात्र केले आहे. दरम्यान, अशा विद्यार्थ्यांना भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती मिळते, मग ‘स्वाधार’चा लाभ का नाही, असा जाब परिवर्तनवादी चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना विचारला आहे.

परिवर्तनवादी चळवळीचे अध्यक्ष राहुल मकासरे यांचे म्हणणे आहे की, मुक्त विद्यापीठाची पदवी घेतल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे. यापैकी अनेकांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयाकडे ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला. मात्र, वर्ष होत आले तरीही या विद्यार्थ्यांचा ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी विचार झालेला नाही, याचा जाब समाजकल्याण अधिकाऱ्यांंना विचारण्यात आला. जर ८ फेब्रुवारीपर्यंत या शिष्यवृत्तीचा विचार झाला नाही, तर समाजकल्याण कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा मकासरे यांनी दिला आहे.

दरम्यान, समाजकल्याण विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, नियमानुसार ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीसाठी दहावी, बारावी आणि पदवी शिक्षणात ५० गुण किंवा त्याहून अधिक गुण मिळणे आवश्यक आहे. मात्र, दहावी किंवा बारावीचे शिक्षण न घेताच काहींनी केवळ प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मुक्त विद्यापीठात पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यामुळे आम्ही विभागीय शिक्षण मंडळाकडे दहावी- बारावीची परीक्षा आणि मुक्त विद्यापीठाची प्रवेश परीक्षा या सारख्याच आहे का, याचे मार्गदर्शन मागविणार आहोत. त्यानंतर समाजकल्याण आयुक्तालयाकडेदेखील यासंबंधीचे मार्गदर्शन घेत आहोत. तोपर्यंत या विद्यार्थ्यांना अपात्र यादीत टाकण्यात आले आहे.

चालू शैक्षणिक वर्षाचे ८ हजार अर्जचालू शैक्षणिक वर्षासाठी (२०२३-२४) विद्यार्थ्यांकडून ‘स्वाधार’साठी अर्ज मागविण्यात आले असून आतापर्यंत ८ हजारांहून अधिक अर्जांचे वितरण झाले असून अनेक अर्ज प्राप्तही झाले आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत अर्ज वितरण व जमा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. याशिवाय, सन २०२२-२३ वर्षातील २३८० विद्यार्थ्यांची १० कोटी ८७ लाख रुपयांची ‘स्वाधार’ शिष्यवृत्तीची बिले कोषागार कार्यालयात दाखल करण्यात आली आहेत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादScholarshipशिष्यवृत्तीEducationशिक्षण