शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
Video - संतापजनक! सर्दीच्या उपचारासाठी आलेल्या मुलाला डॉक्टरने दिलं सिगारेट ओढण्याचं ट्रेनिंग
4
आता सूनच नाही तर सासूलाही करता येणार कौटुंबिक हिंसेविरोधात तक्रार, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय  
5
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
6
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
7
बुलढाणा: केसगळतीनंतर आता ‘नखगळती’; ४६ जण बाधित; शेगाव तालुक्यातील ५ गावांत लक्षणे
8
शिक्षक भरती घोटाळ्यात मंत्रालयातील अधिकारी? गुन्हे दाखल करण्याची मागणी
9
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
10
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
11
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
12
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
13
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
14
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
15
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
16
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
17
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
18
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
19
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
20
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव

सूचनेनंतरही १७६ महाविद्यालयांचे पदवी वितरणाकडे दुर्लक्ष; विद्यापीठाने मागितला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 14:02 IST

परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी प्राचार्यांना पत्र पाठवून खुलासा मागितला आहे.

छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची उदासीनता काही केल्या संपत नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. विद्यापीठाचा ६५ वा दीक्षांत सोहळा २२ फेब्रवारी रोजी घेण्यात आला. या सोहळ्यानंतर संलग्न महाविद्यालयांनी पदवी वितरण सोहळा महिनाभराच्या आत महाविद्यालयांमध्ये घेण्याचा नियम आहे. मात्र, दीक्षांत सोहळ्यास दोन महिने होत आले तरी १७६ महाविद्यालयांनी विद्यापीठाकडून पदवी प्रमाणपत्रच घेऊन गेले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी प्राचार्यांना पत्र पाठवून खुलासा मागितला आहे.

विद्यापीठ कायद्यानुसार दीक्षांत सोहळा २२ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात विद्यापीठात पार पडला. या सोहळ्यात पीएच.डी. धारक आणि विद्यापीठातील पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना पदव्यांचे वितरण करण्यात आले. त्याचवेळी संलग्न महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून पदवी प्रमाणपत्र नेऊन महाविद्यालयात पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ महिनाभरात घेण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार महाविद्यालयांनी तत्काळ समारंभ घेण्याची आवश्यकता असताना दुसऱ्या सत्राची परीक्षा पूर्ण होत असतानाही घेतले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परीक्षा संचालक डॉ. भारती गवळी यांनी ३ एप्रिल रोजी महाविद्यालयांच्या प्राचार्यांना पत्र काढून पदवी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्याकडेही १७६ महाविद्यालयांनी पदवी प्रमाणपत्र घेऊन जाण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परीक्षा संचालकांनी याबाबत खुलासा मागितला आहे.

१२ दिवसांत खुलासा करापरीक्षा संचालकांनी प्राचार्यांना लिहिलेल्या पहिल्या पत्रानुसार ४ ते १४ एप्रिलदरम्यान महाविद्यालयांनी त्यांच्या खास दूतामार्फत परीक्षा विभागातून शिक्क्यांसह पदवी प्रमाणपत्र घेऊन जावे आणि समारंभ घेतल्याविषयी अहवालही तत्काळ विद्यापीठात पाठवावा, असेही पत्रात स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, ही मुदत संपल्यानंतरही प्रमाणपत्र घेऊन न जाणाऱ्या महाविद्यालयांनी २९ एप्रिलपर्यंत खुलासा करावा, असे पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरEducation Sectorशिक्षण क्षेत्र