शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

दाभोळकर हत्याकांडातील संशयित शरद कळसकरच्या गावातील ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 3:15 PM

या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

ठळक मुद्देपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाले

औरंगाबाद : दौलताबादपासून जवळच ऐतिहासिक दौलताबाद किल्याच्या पाठीमागे असलेल्या रामपुरी -केसापुरी ग्रुपग्रामपंचायत कार्यालयाला अज्ञात समाजकंटकांनी आज पहाटे पाच वाजेच्या सुमारास आग लावली. या आगीत संपूर्ण जुने, नवीन अभिलेखे, संगणक, महत्वाची कागदपत्रे व काही नगदी पैसे जळून खाक झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दाभोळकर हत्याकांडातील संशयित आरोपी शरद कळसकर याचे हे गाव आहे. या घटनेमागे कोण आहे व ग्रामपंचायत जाळण्याने कारण काय, याचा तपास पोलिसांनी सुरु केला आहे. 

साधारण दोन हजार लोकसंख्येचे हे गाव असून दोन वर्षांपूर्वीच या ग्रामपंचायत कार्यालयाचे नवीन इमारतीत स्थलांतरित करण्यात आले होते. शुक्रवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास गावातील काही शेतकरी शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना त्यांनी ग्रामपंचायत जळत असल्याचे पाहिले. त्यांनी या घटनेची माहिती सरपंच शांताराम वाहुळ, ग्रामपंचायत सदस्य रामनाथ सुराशे, ज्ञानेश्वर पवार यांना दिली. त्यांनी तात्काळ ही माहिती दौलताबाद पोलीस ठाण्याला दिली.

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विवेक सराफ, उपनिरीक्षक दिनेश सुर्यवंशी, विस्तार अधिकारी एम.सी. राठोड, उपविस्तार अधिकारी शिवाजी सोळुंकी, पोलीस उपनिरीक्षक विक्रम वडने यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट दिली. त्यांनी या घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे मोहन मुंगसे, हरिभाऊ घुगे, राजेंद्र निकाळजे, प्रशांत गायकवाड, दिनेश मुंगसे हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले व त्यांनी आग आटोक्यात आणली. परंतु तोपर्यंत सर्व अभिलेखे व संगणक जळून खाक झाले होते.

ग्रामसेवक व्ही.पी. क्षीरसागर यांनी सांगितले की, या घटनेमध्ये अंदाजे पाच ते सहा लाखांचे नुकसान झाले. आगीत गावातील कराच्या रकमेसह महत्त्वाचे दस्तावेज, कागदपत्र, पूर्णअभिलेखे, संगणक, अभिलेखाचे कपाटे, फर्निचर साहित्य, जलशुद्धीकरणचे रिकामे जार जळून खाक झाले. या समाजकंटकांनी खुर्च्यांची मोडतोड करत सरपंच, उपसरपंच यांच्या नामफलकावर फुल्या मारल्या आहेत. संगणकाची जाळपोळ केल्याने गावातील जन्म, मृत्यू, नमुना आठ, महत्त्वाच्या नोंदी, जुना अभिलेख नष्ट झाला.

घटना नियोजित; विष टाकून कुत्रेही मारलेग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार परिसरातील दोन ते तीन दिवसांपासून सहा ते सात कुत्रे विष टाकून मारण्यात आले. रात्रीसुद्धा दोन कुत्रे मारण्यात आल्याने गूढ वाढले आहे. ही घटना नियोजित असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी व पोलीस तळ ठोकून आहेत. आग लावणाऱ्या आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCrime Newsगुन्हेगारीfireआगgram panchayatग्राम पंचायत