लोकमत न्यूज नेटवर्कखुलताबाद : तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी ७ आॅक्टोबरला मतदान होत असून गावागावात प्रचारास सुरूवात झाली आहे. यंदा सरपंचाची निवड थेट जनतेतून होत असल्याने उमेदवार मतदारांच्या भेटीसाठी सकाळीच दारोदार जात आहेत.शूलीभंजन -नंद्राबाद ग्रूपग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी परिवर्तन गाव विकास पॅनलच्या उमेदवारांनी रविवारी सकाळी नंद्राबाद गावात प्रचार रॅली काढून घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटी घेतल्या. सरपंचपदाचे उमेदवार सय्यद इलियास सय्यद युनूस तर सदस्यपदाचे उमेदवार संतोष श्रीराम बोडखे, मंगलबाई विष्णू घुसळे, योगिता राजेश वाघ, व्दारकादास घोडके, रूपाली घोडके, रामदास निंभोरे, द्वारकाबाई निकाळजे, पुजा घाटे, जया जाधव, देवीदास बागूल, शेकनाथ गायकवाड आदींनी मतदारांना विजयी करण्याचे आवाहन केले.या प्रचार रॅलीत महेंद्र घुसळे, किरण गायकवाड, महेश तुपे, कैलास पवार, विलास सोनवणे, महेंद्र देहाडे, कानिफनाथ पवार, संतोष भोले, प्रशांत देहाडे, हर्षवर्धन भुजंग, अक्षय दिवेकर, साहेबराब बोडखे, प्रवीण घुसळे, विष्णू घुसळे, अमोल बोडखे, राजेश बोडखे, साईनाथ सोनवणे, अप्पाराव घुसळे, अण्णा बनकर, महेंद्र घुसळे, अश्विन घुसळे, शुभम् तुपे, राज बोडखे, साईनाथ केदारे, दत्तू फुलारे, कारभारी निकाळजे, रामेश्वर बोडखे, अभिजित देहाडे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी सहभागी झाले होते.दरम्यान, सरपंचपदाचे उमेदवार नितीन जाधव यांनीही शुलीभंजन परिसरात उमेदवाराच्या भेटी घेतल्या. शुलीभंजन -नंद्राबाद ग्रुप ग्रामपंचायत सरपंचपदासाठी एकूण तीन उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी मुख्य लढत सय्यद इलियास व नितीन जाधव यांच्यातच होणार असल्याचे एकंदरीत चित्र आहे. २२०० मतदार आहेत. ७ रोजी सर्वांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
उमेदवार दारोदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 12:00 AM