छत्रपती संभाजीनगर : जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे आज दुपारी जालना येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हिरवा झेंडा दाखवून थाटात उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर एक्सप्रेसमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालना ते छत्रपती संभाजीनगर प्रवास केला. ही एक्सप्रेस सुरू झाल्याने प्रवाशांची मोठी सोय झाली आहे. मात्र, नववर्षातच ती सर्वसामान्यांच्या सेवेत रुजू होणार असून, १ जानेवारी रोजी मुंबईवरून जालन्याला पोहोचेल, तर २ जानेवारीपासून जालन्याहून मुंबईच्या दिशेने नियमित धावणार आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची नियमित सेवेची सुरुवात १ जानेवारीपासून होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. मराठवाडा रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष अनंत बोरकर म्हणाले, रेल्वेचे तिकीट दर अजून जाहीर झालेले नाहीत. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत कुठलीही बुकिंग सुरू झाली नव्हती. शनिवारी दुपारी तिकीट दर समजण्याची शक्यता आहे.
...असे आहे वेळापत्रक२०७०६ - मुंबई- जालना वंदे भारत एक्स्प्रेस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून दि.१ जानेवारीपासून रोज (बुधवार वगळता) १३.१० वाजता सुटेल आणि नमूद वेळापत्रकानुसार त्याचदिवशी २०.३० वाजता जालना येथे पोहोचेल.
स्थानके- आगमन / निर्गमनछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई /१३.१० वाजतादादर - १३.१७ वाजता / १३.१९ वाजताठाणे - १३.४० वाजता/१३.४२ वाजताकल्याण जंक्शन - १४.०४ वाजता / १४.०६ वाजतानाशिक रोड - १६.२८ वाजता/१६.३० वाजतामनमाड जंक्शन - १७.३० वाजता / १७.३२ वाजताछत्रपती संभाजीनगर- १९.०८ वाजता / १९.१० वाजताजालना - ---/२०.३० वाजता
२०७०५ जालना- मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस :२ जानेवारीपासून रोज (बुधवार वगळता) ०५.०५ वाजता सुटेल आणि नमूद वेळापत्रकानुसार त्याचदिवशी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
स्थानके - आगमन/निर्गमनजालना ---/०५.०५ वाजताछत्रपती संभाजीनगर - ०५.४८ वाजता/०५.५० वाजतामनमाड जंक्शन - ०७.४० वाजता/०७.४२ तासनाशिक रोड - ०८.३८ वाजता/०८.४० वाजताकल्याण जंक्शन - १०.५५ वाजता/१०.५७ वाजताठाणे - ११.१० वाजता/११.१२ वाजतादादर - ११.३२ वाजता / ११.३४ वाजताछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई - ११.५५ वाजता/
थांबे : दादर, ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड आणि छत्रपती संभाजीनगर