महालगाव (जि. औरंगाबाद) : शेतवस्तीवरील घराकडे जात असताना अचानक पूर आल्याने आजोबा व नातू वाहून गेले आणि दोघेही तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी वैैजापूर तालुक्यातील महालगाव येथे घडली. गुरुवारी सकाळी आजोबाचा मृतदेह सापडला असून बेपत्ता नातवाचा शोध घेणे उशिरापर्यंत सुरु होते. बबनराव त्र्यंबक विखे (५५) आणि वैैभव ज्ञानेश्वर भंडारे (४) अशी या दोघांची नावे आहेत.गंगापूर तालुक्यातील बगडी ममदापूर येथील बबनराव त्र्यंबक विखे यांची विवाहित मुलगी महालगाव येथे तलावाजवळील शेतवस्तीवर राहते. गेल्या महिन्यात त्यांची मुलगी प्रसुतीसाठी बगडी ममदापूरला गेली होती. सोबत तिने आपला मुलगा वैैभव ज्ञानेश्वर भंडारे यालाही नेले होते. परंतु वैभव वडिलांकडे जाण्याचा हट्ट करु लागल्याने बुधवारी वैभवला घेऊन बबनराव महालगाव येथे आले. सायंकाळी जोरदार पाऊस सुरु असल्याने दोघेही तलावाजवळून शेतवस्तीकडे जात होते. परंतु अचानक पूर आल्याने तलावात पाणी वाढले आणि त्यात आजोबा-नातू बुडाले. तलाव ७० टक्के भरल्याने गावकºयांनी लगेच शोधकार्य सुरु केले. अखेर गुरुवारी सकाळी रंगनाथ आल्हाट या ग्रामस्थाने बबनरावांचा मृतदेह शोधून काढला. सायंकाळपर्यंत औरंगाबादचे अग्निशमन दलाचे पथक, नेवरगावचे दिगंबर पंढूरे, बाळासाहेब वालतुरे, तुकाराम बर्डे, कैैलास डौैले व बचाव पथक बेपत्ता वैभवचा शोध घेत होते.
आजोबा, नातू तलावात बुडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 6:49 PM
शेतवस्तीवरील घराकडे जात असताना अचानक पूर आल्याने आजोबा व नातू वाहून गेले आणि दोघेही तलावात बुडाल्याची घटना बुधवारी सायंकाळी वैैजापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील महालगाव येथे घडली.
ठळक मुद्देऔरंगाबाद जिल्ह्यातील घटना आजोबाचा मृतदेह सापडला; नातवाचा शोध सुरूच