शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

मोजक्याच शेतकऱ्यांना गारपीट अनुदान

By admin | Published: May 02, 2016 11:45 PM

धारूर : २०१४ मधील गारपिटीने तालुक्यातील धुनकवड गावात धुमाकूळ घातला होता. परिणामी उसासह फळबागा आणि इतर पिके उद्ध्वस्त झाली;

महसूल यंत्रणेची मनमानी : धुनकवडचे शेतकरी हैराण; तलाठी जबाबदार असल्याचा आरोपधारूर : २०१४ मधील गारपिटीने तालुक्यातील धुनकवड गावात धुमाकूळ घातला होता. परिणामी उसासह फळबागा आणि इतर पिके उद्ध्वस्त झाली; मात्र ४०० पेक्षा अधिक शेतकरी असलेल्या या गावातील केवळ १२५ लोकांना गारपीट अनुदान आले असून, इतरांच्या पदरात काहीच पडले नाही. महसूल यंत्रणेच्या मनमानीमुळे व पाहणी अहवाल घरात बसून केल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित रहावे लागले. नैसर्गिक संकट आल्यानंतर तलाठी, ग्रामसेवक ही जी महसूल खात्याची यंत्रणा आहे. त्यांच्या मनमानीचा फटका गोरगरीब शेतकऱ्यांना कसा बसतो याचे उदाहरण म्हणजे हे गाव आहे. २०१४ ला गारपीट झाली, तेव्हा या गावात काही मोजक्याच शेतकऱ्यांच्या शेतात झाली असे नव्हते. आसपासच्या गावासह संपूर्ण शिवारात गारपीट झाली, ज्यामुळे उभ्या पिकाचं नुकसान झाले होते. फळबागासह इतर पिके उद्ध्वस्त झाली. मात्र पंचनामा करणाऱ्या महसूल यंत्रणेने तालुक्याच्या ठिकाणी बसूनच काही ठराविक शेतकऱ्यांच्या याद्या तयार केल्या. ज्याचा लाभ केवळ १२५ शेतकऱ्यांना मिळाला. वास्तविक पाहता माजलगाव, परळी, अंबाजोगाई आदी तालुक्यात गारपीट झाल्यानंतर तलाठ्याने गावातील संपूर्ण शेतकऱ्यांना लाभ मिळवून दिल्याचे निदर्शनास आले. मात्र या गावात जाणीवपूर्वक बाकीच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. खरं तर हा भेदभाव महसूल यंत्रणेने का केला, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे. आज ज्यांना अनुदान मिळाले ते शेतकरी दुष्काळात खुश असले तरी दुष्काळात होरपळणारे शेतकरी मोठ्या प्रमाणावर बाकी राहिल्याने गावात अनेकांच्या चेहऱ्यांवर निराशा आहे. (वार्ताहर)उर्वरित शेतकऱ्यांचा अनुदानासाठी अहवाल तयार करामहसूल यंत्रणा कधीकधी सामान्य जनतेच्या मुळावर कशी उठते याचा हा प्रकार आहे. आता अनुदान जरी मिळाले नाही तरी या प्रश्नाचे गांभीर्य फार मोठे आव्हानात्मक असून, याची चौकशी करावी व उर्वरित शेतकऱ्यांचा अनुदानासाठी अहवाल तयार करावा, अशी मागणी राम कुलकर्णी यांनी केली.