शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
3
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
4
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
5
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
6
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
7
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
8
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
9
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
10
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
11
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
12
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
13
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
14
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
15
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
16
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
17
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
18
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
19
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
20
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."

अनुदान वाटप धिम्या गतीने

By admin | Published: March 15, 2016 12:11 AM

व्यंकटेश वैष्णव , बीड दुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे.

व्यंकटेश वैष्णव , बीडदुष्काळी अनुदानाचा सरकारने मोठा गाजावाजा केला. मात्र वाटप धिम्या गतीने होत असल्याचे चित्र बीड जिल्ह्यात पाहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासनाने वाटपाला विलंब होत असल्याबाबत बँकांकडे मनुष्यबळ अपुरे असल्याचा बाऊ केला आहे. दुष्काळी अनुदानाची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयातून बँकांकडे गेली असली तरी संबंधित बँकांमधून शेतकऱ्यांच्या हातात पैसे पडण्यास विलंब होत आहे.बीड जिल्ह्यासाठी ५१ कोटी ५८ लाख ८ हजार एवढे अनुदान आले आहे, यापैकी ४९ कोटी ९० लाख ७ हजार ६१३ एवढे अनुदान बँकांकडे वर्ग झाले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे अनुदान वर्ग झाले असले तरी अद्यापपर्यंत शेतकऱ्यांच्या हातात पडले नाही, ही वस्तूस्थिती आहे. शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी बँकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने विलंब होत आहे. शेतकरी दुष्काळी अनुदानाच्या आशेने संबंधित राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये चकरा मारीत आहेत; मात्र तेथे गेल्यानंतर बँक कर्मचारी अनुदान वाटपास अवधी असल्याचे सांगत आहेत.दरम्यान, जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनाही आपल्याच मागण्यांचे पडले आहे. सोमवारपासून त्यांनी सामूहिक रजा टाकल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावीच लागणार आहे.दीड कोटी निधी पडूनदुष्काळी अनुदानातील दीड कोटींवर रक्कम अद्यापपर्यंत संबंधित तहसील कार्यालयांना वर्ग झाली नसल्याचे सोमवारी समोर आले आहे. बीड जिल्ह्यात एकूण ९६ हजार ९८७ शेतकरी अनुदानाचे लाभार्थी आहेत.बीडमध्ये १०० टक्के वाटप११ तालुक्यांपैकी बीड तहसीलने १०० टक्के निधी बँकांकडे वर्ग केला आहे, असे अहवालात नमूद आहे. सध्या बँकांमधून वाटपही सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळते; मात्र तालुक्यातील १३ हजार ८३९ पैकी ५ हजारांवर शेतकऱ्यांना ९०० ते ११०० एवढीच रक्कम दुष्काळी अनुदानाची मिळाली असल्याचे चौसाळा येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.बीड तालुक्यातील चौसाळा परिसरातील शेतकऱ्यांचे दुष्काळी अनुदान एक महिन्यापूर्वीच जिल्हा बँकेत जमा झाले आहे. मात्र, बँकांच्या अंतर्गत अडचणींमुळे निधीचे वाटप करणे शक्य होत नाही. शेतकरी रोज बँकेकडे दुष्काळी अनुदानासाठी चकरा मारतात. मात्र, बँक कर्मचाऱ्यांकडून शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.४मागील आठवड्यात वाटप सुरळीत सुरू होते; मात्र सोमवारी जिल्हा बँक कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी उपोषण करून बँक बंद केल्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बँकेच्या दारालाच त्यांनी चपलांचा हार घालून आंदोलन केले.