औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा आलेख वाढतच आहे. जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल १५६ नव्या रुग्णांची वाढ झाली. दिवसभरात ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.
जिल्ह्यात सध्या ६०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४८ हजार १३५ झाली आहे. यात आतापर्यंत ४६ हजार २८७ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२४६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या १५६ रुग्णांत मनपा हद्दीतील १३३, ग्रामीण भागातील २३ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ४३ आणि ग्रामीण भागातील ९ अशा एकूण ५२ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली.
मनपा हद्दीतील रुग्ण - १३३सातारा परिसर १, भाग्योदयनगर १, शिवाजीनगर १, वैजयंतीनगर १, साईनगर, देवळाई १, चिकलठाणा २, सिडको ३, हर्सूल, यासाननगर १, ओरीयन अपार्टमेंट स्टेशन रोड परिसर १, टीव्ही सेंटर १, हर्सूल, जकात नाका १, अयोध्यानगर, सिडको १, घाटी परिसर २, गारखेडा २, पैठण एकतुणी १, एन-११, हडको १, सुभाषचंद्र बोस नगर २, बेगमपुरा १, गुरू सहानीनगर २, एन-५, अनिरुद्ध कॉलनी १, बीड बायपास १, देवळाई परिसर १, मयूर पार्क १, जवाहर कॉलनी २, सिडको २, ज्योतीनगर २, बन्सीलालनगर २, राजनगर १, पोर्णिमा बिल्डिंग १, म्हाडा कॉलनी १, साकला गार्डन, हर्सूल १, नवजीवन कॉलनी १, उस्मानपुरा १, एन-११ येथे १ , जाधववाडी १, भारतीय विद्यालय, हडको १, एन-७, सिडको १, सांवगी २, सिडको, एन-६ येथे १, उस्मानपुरा १, जवाहर कॉलनी १, बन्सीलालनगर १, खडकेश्वर १, सुराणानगर ३, एन-५, सिडको १, हायकोर्ट कॉलनी १, वेदांतनगर १, पदमपुरा १, मेडीकेअर हॉस्पिटल परिसर १, अन्य ७०
ग्रामीण भागातील रुग्ण-२३पैठण एकतुणी १, मोहटा देवी मंदिर, बजाजनगर १, गुरुकृपा हौ. सो. बजाजनगर २, शिवाजीनगर, वाळूज १, सिल्लोड १, अन्य १७.