राजेश खराडे बीडगत आठवड्यातील कडाक्याच्या थंडीनंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे हरभऱ्यावर घाटीअळीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. मात्र, तापमान वाढल्याने ज्वारीची वाढ जोमात होऊ लागली आहे.रबी हंगामात यंदा शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करून ज्वारीबरोबर हरभरा, गव्हावरील भर दिला आहे. अद्यापपर्यंतच्या अनुकूल वातावरणामुळे पिके जोमात आहेत. चार दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले असून, थंडी गायब झाली आहे. हरभऱ्याची वाढ जोमात होत असतानाच त्याला ढगाळ वातावरणामुळे घाटीअळीचा धोका निर्माण झाला असून, पाऊस पडल्यास निसवलेल्या गव्हाच्या लोंब्याचा रंग बदलून पांढरा पडण्याची शक्यता वाढली आहे. अधिकच्या थंडीमुळे आकसलेल्या ज्वारीची जोमाने वाढ होऊ लागली आहे. रबी हंगामातील पिके शेतकऱ्यांना उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. त्यानुसार त्यांचे संरक्षण होणे गरजेचे आहे. या संभाव्य किडीपासून संरक्षण होण्यासाठी विद्यापीठाने ठरवून दिलेल्या प्रणालीचा वापर होणे गरजेचे आहे. दरम्यान, जोरदार पावसामुळे दुष्काळ धुवून निघाला. यंदा शेत शिवार पिकांनी फुलले आहेत. मात्र कीड नियंत्रणासाठी आता शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे.
हरभरा, गव्हाला किडीच्या प्रादुर्भावाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2017 10:41 PM