शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

‘लोकमत महामॅरेथॉन’बदल धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता; ऑनलाइन रजिस्ट्रेशन आता अंतिम टप्प्यात

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 12, 2023 4:10 PM

१७ डिसेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामॅरेथॉनमध्ये जिंकण्यासाठी धावपटू प्रचंड मेहनत घेत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्रातील प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या ‘लोकमत महामॅरेथॉन’ मध्ये सहभागी होण्यासाठी धावपटूमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. यामुळे नावनोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. राज्यातूनच नव्हे, तर परराज्यातील धावपटूही यात सहभागी होत आहेत.

विभागीय क्रीडा संकुलावर रविवारी, १७ डिसेंबर रोजी ‘लोकमत महामॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या महामॅरेथॉनमध्ये जिंकण्यासाठी धावपटू प्रचंड मेहनत घेत आहेत. या प्रतिष्ठेच्या महामॅरेथॉनमध्ये मीच बाजी मारणार, असा आत्मविश्वास प्रत्येक धावपटू व्यक्त करीत आहे. एरवी एकटे धावणे व महामॅरेथॉनमध्ये हजारो धावपटूसोबत धावणे यात मोठा फरक आहे, म्हणूनच तर धावपटू वर्षभर ‘लोकमत महामॅरेथॉन’ची प्रतीक्षा करीत असतात. याची प्रचिती नावनोंदणीवरून येत आहे. जसजशी तारीख जवळ येत आहे, तसतशी धावपटूंची नावनोंदणी वाढत आहे आणि आपला सहभाग निश्चित करून घेत आहे. अनेक जण ग्रुपने यात सहभागी होत आहेत, तसेच अनेक जण आपल्या फॅमिलीची नावनोंदणी करीत आहेत. ऑनलाइन नावनोंदणी आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. यामुळे ज्यांना या महामॅरेथॉनमध्ये ‘याची देही याची डोळा’ अनुभव घ्यायचा आहे. त्यांनी आता वेळ न दवडता लगेच ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावे, कारण रजिस्ट्रेशन बंद झाल्यावर होणारी निराशा टाळण्यासाठीही शेवटची संधी आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे.

ग्रुप रजिस्ट्रेशनला मोठा प्रतिसादमहाविद्यालयातील एनसीसी, एनएसएसचे विद्यार्थी असो वा कंपनीमधील कर्मचारी, अधिकारी, तसेच कॉलन्यामधील मित्रमंडळ सर्व जण ग्रुप रजिस्ट्रेशन करीत आहेत. २५ ते ५० जणांच्या ग्रुप रजिस्ट्रेशनला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे.

निरोगी आयुष्याचा संदेशलोकमत महामॅरेथॉनमध्ये सहभागी होऊन अनेक जण ‘निरोगी आयुष्याचा’ संदेश शहरवासीयांना देणार आहेत. आम्ही धावतो, तुम्हीही नावनोंदणी करून आमच्यात सहभागी व्हा, असे आवाहनही सोशल मीडियावर धावपटू करत आहेत.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनAurangabadऔरंगाबाद