याप्रसंगी भागवताचार्य ह.भ.प. विशाल महाराज खोले यांचे कीर्तन पार पडले. यावर्षी पळशी खुर्द गावाला पुण्यतिथी सोहळ्याचा मान मिळाला होता. पळशी खुर्द गाव ते भगवानगड अशी टाळ मृद्ंगाच्या गजरात पालखी काढण्यात आली. भगवानगडावर समारंभाचे सूत्रसंचालन गणेश भुमे यांनी केले. भगवानबाबा विद्यालय, राधाबाई शिंदे विद्यालय, अंजनासागर विद्यालय, मातोश्री विद्यालय यांनी सोहळ्याच्या यशस्वितेसाठी पुढाकार घेतला.
याप्रसंगी वाकी येथील शनैश्वर संस्थानचे सुखदेव महाराज, पुरणवाडी येथील भावनेश्वर संस्थानचे केवलानंदजी महाराज, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आ. उदयसिंग राजपुत, पंचायत समिती सभापती आप्पाराव घुगे, पुंडलिक काजे, केतन काजे, अर्जुन पाटील, संजय गव्हाणे, सरपंच देवीदास काळे, मनोहर नीळ, पुंडलिक घुगे, पांडुरंग घुगे, राहुल पाटणी, देवमन घुगे, विलास पवार, संजय घुगे, भगवान गड संस्थानचे अध्यक्ष सुधीर घुगे तथा सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.
फोटो - राष्ट्रसंत भगवानबाबा यांचा ५६ वा पुण्यतिथी सोहळा मेहेगाव येथील भगवानगडावर शुक्रवारी साजरा करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवर.