पालोदकर यांनी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला उत्तम बाजारभाव मिळावा यासाठी सहकार तत्त्वावर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, सूतगिरणी, औद्योगिक संस्था, राजर्षी शाहू शिक्षण संस्थेची स्थापना केली. सहकार क्षेत्रात त्यांनी विकासाची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या या योगदानास स्मरून त्यांना जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, उपाध्यक्ष अभय वाघ, संचालक पूर्णेराव साळवे, कल्याण गोराडे, पंडितराव गोडसे, कौतिकराव कळम, आशीष पालोदकर, बँकेचे कर्मचारी उपस्थित होते. यासह सेना भवनातदेखील पालोदकरांची जयंती साजरी झाली. यावेळी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांना अभिवादन करण्यात आले.
-- फोटो
190621\img_20210619_174206.jpg
कॅप्शन
सिल्लोड येथील सिद्धेश्वर अर्बन को-ऑप. बँकेत सहकार महर्षी माणिकरावदादा पालोदकर यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रभाकरराव पालोदकर, उपाध्यक्ष अभय वाघ, संचालक पूर्णेराव साळवे, कल्याण गोराडे, पंडितराव गोडसे, कौतिकराव कळम, आशिष पालोदकर दिसत आहे.