शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..?";वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा
2
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
4
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
6
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
7
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
8
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
9
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
10
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
11
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
12
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
13
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
14
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
15
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
16
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
17
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
18
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
19
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
20
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...

टूलकिट प्रकरणातील शंतनु मुळूकला १० दिवसाचा ट्रान्झिट अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 7:11 PM

Greta Thunberg toolkit case टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देबेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू मुळूक याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट घेतले होते.

औरंगाबाद : ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात बीड येथील शंतनू शिवलाल मुळूक याला औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी यांनी मंगळवारी १० दिवसाचा अटकपूर्व ट्रान्झिट जामीन मंजूर केला. बेंगळुरू येथून दिशा रवी हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी शंतनू मुळूक याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट घेतले होते .

टुलकिट गुगल डॉकसाठी वापरण्यात आलेला ई-मेल आयडी शंतनूचा असल्याचे सांगितले जात आहे. दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करेपर्यंत, अटकेची कारवाई टाळण्यासाठी मुळूक याने औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतेज जाधव यांच्या मार्फत अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला होता. खंडपीठात सुनावणीदरम्यान युक्तिवाद करण्यात आला की, आपले  स्वातंत्र्य अबाधित राखणे आपला हक्क आहे. सत्य मiडण्याकरिता आपल्याला न्यायालयापुढे हजर राहायचे आहे. हे प्रकरण दिल्ली न्यायालयापुढे सुरू असल्याने त्याची गुणवत्ता निश्चित करण्याचे अधिकार त्यांनाच आहेत. शासनातर्फे मुळूकला अटकपूर्व ट्राझिट जामीन देण्यास विरोध करण्यात आला. सुनावणीअंती खंडपीठाने मूळ प्रकरणाच्या गुणवतेवर कोणतेही भाष्य न करतावरील प्रमाणे आदेश दिला. याप्रकरणी शासनाच्या वतीने अॅड. एस. वाय. महाजन यांनी काम पाहिले.

 

टूलकिट प्रकरण : निकिता जेकब यांच्या ट्रान्झिट जामिनावर हायकोर्ट उद्या देणार निर्णय

 

दिल्ली पोलीस दोन दिवस होते बीडमध्ये शंतनूचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस दोन दिवस बीडमध्ये तळ ठोकून होते. मात्र, त्यांना शंतनू सापडला नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे सूत्रांकडून समजते. बीडमधील संशयित शंतनूचे जागतिक पातळीवर पर्यावरणासंदर्भात काम आहे. या तरुणासह इतर चार अशा पाच लोकांचा ग्रुप असल्याचे सांगण्यात येते. याच ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासूनच पाठिंबा दर्शविला होता, असेही सूत्रांकडून सांगण्यात येते.

टॅग्स :Aurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठGreta Thunbergग्रेटा थनबर्गAurangabadऔरंगाबादBeedबीडToolkit Controversyटूलकिट वादdelhiदिल्लीCourtन्यायालय