औरंगाबाद : सिडको एन-२ भागातील संघर्षनगर येथील ओमसाई किरणा स्टोअर्सचे मालक अनिल वामनराव क्षीरसागर (२९) यांनी बुधवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही.
मयत अनिल हे आठ वर्षापासून किराणा दुकान चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. नेहमीप्रमाणे बुधवारी पहाटे दुध घेण्यासाठी उठले. दुधाचे कॅरेट दुकानात ठेवल्यानंतर दुकाना समोरील झाडझुड केली. सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दुध घेण्यासाठी आलेल्या ग्राहकाने दुकानाचे शटर वाजविले, या आवजाने अनिल यांचे वडिल घरातून उठून आले. त्यांनी दुकानात आणि बाथरूममध्ये अनिलला शोधले तेथे अनिल नसल्याने दुकानाच्या पाठीमागे असलेल्या खोलीचे दार ठोठविला. आतून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे त्यांनी दरवाजाची लाकडी फळी वाकवून आत डोकावून पाहिले असता अनिलने गळफास घेतल्याचे त्यांना दिसले . यामुळे त्यांनी रडण्यास सुरुवात केली.
या घटनेची माहिती मुकुंदवाडी पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिलने छताच्या हुकला लुंगीने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. त्याला बेशुद्ध अवस्थेत उपचारासाठी घाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरने त्यांना तपासून मृत घोषीत केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. व्यापारी अनिल यांच्या पार्थीवावर मुकुंदवाडी स्मशानभूमी मध्ये दुपारी दोन वाजता अत्यंसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.पोहे कॉ जगदाळे तपास करीत आहेत.