शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

औरंगाबाद जिल्ह्यातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 7:12 PM

भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे. 

ठळक मुद्देनऊपैकी एकाही तालुक्यात वाढली नाही पाणीपातळी

औरंगाबाद : जिल्ह्यातील भूजलपातळीत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. नऊपैकी एकाही तालुक्यातील पाण्याचे प्रमाण वाढले नसल्यामुळे येणाऱ्या काळात जलसंकटाचा सामना ग्रामीण भागातील नागरिकांना करावा लागणार आहे. पर्जन्यमान आणि विहिरींतील निरीक्षणाच्या आधारे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी केलेल्या विश्लेषणावरून पाणीपातळीत मोठी घट झाल्याचे दिसते आहे. 

भूवैज्ञानिकांनी भूजलपातळीच्या निरीक्षण विश्लेषणानुसार जिल्ह्यातील एकाही तालुक्यात पाणीपातळी वाढलेली नाही. सप्टेंबर आणि आॅक्टोबर महिन्यांत केलेल्या माहिती संकलनाआधारे मागील पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी पाणीपातळी खोलवर गेली आहे. १४१ विहिरींचे निरीक्षण भूवैज्ञानिकांनी नोंदविले. त्या सर्व विहिरींचा विचार केला असता सरासरी ८.७५ इतकी स्थिर भूजलपातळी जिल्ह्यात आहे. १३५ विहिरींच्या निरीक्षणाचा विचार केला तर तेथील पाणीपातळी घटली आहे. फक्त ६ विहिरींमध्ये पाणीपातळी वाढलेली आढळून आली असून, त्यात औरंगाबाद तालुक्यातील तीन, वैजापूरमधील १ आणि सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील प्रत्येकी एका विहिरीचा समावेश आहे. 

तालुक्याचे   विहिरींची    घट झालेल्यानाव    संख्या      विहिरींची संख्याऔरंगाबाद    १६    १३फुलंब्री    १३    १३पैठण    २०    २०गंगापूर    १७    १७वैजापूर    १६    १५खुलताबाद    ०४    ०४सिल्लोड    १९    १८कन्नड    १८    १८सोयगाव    १८    १७एकूण    १४१    १३५ 

टॅग्स :droughtदुष्काळAurangabadऔरंगाबादWaterपाणी