औरंगाबाद जिल्ह्यातील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे गटसचिव यांचा नियमित पगार नसल्यामुळे ११ जूनपासून त्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. ऐन पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते, औषधी खरेदी करण्यासाठी पैशाची गरज भासते. त्यामुळे राष्ट्रीयीकृत बँकेतून पीककर्ज घेण्यासाठी सोसायटीची बेबाकी प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. परंतु सचिव संपावर असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. याव्यतिरिक्त सोसायटीची कर्ज वाटप व कर्ज वसुली आदी कामे खोळंबली आहेत. शिऊरसह सफियाबादवाडी, हाजीपूरवाडी, रघुनाथपूरवाडी, पेडेफळ, अलापूरवाडी, निमगाव, सावखेडा, बळेगाव, पिंपळगाव गावातील शेतकऱ्यांना शेतीकामे सोडून बेबाकीसाठी सोसायटीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.
--
यासाठी गटसचिव संपावर...
गटसचिवांचे नियमित पगार करण्यात यावेत, उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ७९ (१) अंमलबजावणी बँकेने करावी व एक टक्का शासकीय अनुदानाचे प्रलंबित प्रस्ताव ताबडतोब मंजूर करण्यात यावेत.