शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

स्वस्त इंधनाकडे वाढता कल; सीएनजी कारसाठी औरंगाबादकर वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 6:54 PM

CNG Pumps in Aurangabad : पेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने वाहन धारकांचा कल वाढत आहे

ठळक मुद्दे९ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा सेमी कंडक्टरचा तुटवडा

- प्रशांत तेलवाडकरऔरंगाबाद : पेट्रोलपेक्षा ( Petrol - Diesel Fuel ) कॉम्प्रेस्ट नॅचरल गॅस (CNG) ३७ रुपयांनी स्वस्त असल्याने आणि शहरात ४ सीएनजी पंप सुरू झाल्याने आता जनतेचा कल सीएनजी कारकडे वाढू लागला आहे. परिणामी विविध मॉडेलच्या सीएनजी कार खरेदीसाठी २ ते ९ महिन्यांपर्यंत प्रतीक्षा यादी तयार झाली आहे. ( Growing trend towards cheaper fuels; Aurangabadkar waiting for CNG car) 

पेट्रोल, डिझेल वाहनांमुळे होणारे वायू प्रदूषण ( Air Pollution ) कमी करण्यासाठी शहरात सीएनजीवर धावणाऱ्या कार दोन कंपन्यांनी उपलब्ध केल्या आहेत. यात मारुती-सुझुकी व ह्युंदाई या कंपन्यांचा समावेश आहे. मारुतीने चार, तर ह्युंदाईने तीन सीएनजी मॉडेल बाजारात उतरविले आहेत. शहरात ८ सीएनजी पंप सुरू करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यातील ४ सीएनजी पंप सुरू झाले आहेत. दोन्ही इंधनांवर कारचा ‘ॲव्हरेज’ सारखाच मिळत आहे. शिवाय पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी ३७.२५ रुपयांनी स्वस्त मिळत असल्याने ग्राहक आता पेट्रोल प्लस सीएनजी असलेल्या कार खरेदीसाठी पुढे येऊ लागले आहेत. अहमदनगर येथून सीएनजी पाइपलाइन बीड बायपास ओलांडून शेंद्राकडे गेली आहे. लवकरच पाइपलाइन शहरात येईल तेव्हा सीएनजी सर्व पेट्रोलपंपांवर उपलब्ध होईल, तेव्हा सीएनजीची किंमत आणखी कमी होईल. पेट्रोलला सीएनजी पर्याय उपलब्ध झाल्याचे मत ग्राहकांनी व्यक्त केले.

हेही वाचा - औरंगाबादमध्ये ऑनर किलिंग ? वडिलांनीच खड्डा खोदून पुरला मुलीचा मृतदेह 

सेमी कंडक्टरचा तुटवडासीएनजी कारसाठी सेमी कंडक्टरचा वापर होतो. मलेशियातून ते आयात करावे लागते. मात्र, तिथे लॉकडाऊन असल्याने आयात कमी झाली आहे. यामुळे देशात सीएनजी कारच्या उत्पादनावर परिणाम झाला. याशिवाय मागणी वाढल्याने सीएनजी कार खरेदीसाठी ग्राहकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.- संदेश झांबड, अध्यक्ष चेंबर ऑफ ऑथोराइज ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन

पंप वाढल्यानंतर कारला मागणी वाढेलदेशात सीएनजीचे उत्पादन कमी आहे. जसजसे सीएनजी व पंपांची संख्या वाढेल तसतसे कारला मागणी वाढेल. सध्या सीएनजी कारला प्रतीक्षा आहे. पेट्रोल प्लस सीएनजी कार महाग आहे. यामुळे पेट्रोलवर चालणाऱ्या कारची विक्री काही कमी झाली नाही.- राहुल पगारिया, माजी अध्यक्ष, चेंबर ऑफ ऑथोराइज ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन

लांब पल्ल्यासाठी सीएनजी कारचा वापरपेट्रोलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्याने जे नेहमी लांब पल्ल्याचा प्रवास करतात त्यांच्याकडून सीएनजी कारची मागणी वाढली आहे. सीएनजी कार लगेच मिळत नाही. मॉडेलनुसार १० ते ३६ आठवड्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.- बिनय पंजियार, शाखा व्यवस्थापक, ऑटोमोटिव्ह मारुती-सुझुकी

हेही वाचा - बिबी-का-मकबरा परिसरात दडले काय ? उत्खननात स्नानगृह, शौचालयाचा पाया उघडा

इंधनाचे दर(प्रतिलिटर) ॲव्हरेज (कार)पेट्रोल १०८.६० रु. १२ ते २० कि.मी.डिझेल ९७.५२ रु. १२ ते २० कि.मी.सीएनजी ७१.३५ रु.(कि.ग्रॅ) २५ ते ३२ कि.मी.एलपीजी ६१.८५ रु. (रिक्षासाठी) १९ ते ३५ कि.मी.

शहरात इंधन पंपांची स्थितीपेट्रोल पंप - ४०एलपीजी पंप-१३सीएनजी पंप-४

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPetrol Pumpपेट्रोल पंपtourismपर्यटन