छत्रपती संभाजीनगर : महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार हवा असेल तर नागरिकांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे लागणार आहे. जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांनी अद्यापही हे कार्ड काढलेले नाही. दरम्यान, जिल्हा आरोग्य विभागाने राबविलेल्या मोहिमेत या दहा दिवसांत तब्बल १ लाख ५९५ जणांचे हे कार्ड काढले आहे.
राज्यातील गरीब नागरिकांना गंभीर आजारावरील उपचार तसेच शस्त्रक्रियेसाठी नि:शुल्क व गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत आता ५ लाखांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार असून, सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ मिळणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या सूचनेनुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी जिल्ह्यात गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम राबविली. दहा दिवसांत १८३३ आशा स्वयंसेविकांनी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन केले व १ लाख ५९५ नागरिकांना गोल्डन कार्ड काढून दिले.
काय आहे आयुष्मान भारत कार्ड ?महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत नागरिकांना सरकारी व खासगी दवाखान्यात ५ लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार आहेत. सरकारी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर पुढील १५ दिवस शासनाकडून खर्च करण्यात येणार आहे. योजनेत कुटुंबातील सर्व सदस्यांना वयानुसार योजनेचा लाभ मिळणार आहे. यात लाभार्थ्याला एक रुपयादेखील भरावा लागणार नाही. ही योजना पूर्णपणे कॅशलेस आहे. मात्र, त्यासाठी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड आवश्यक आहे.
जिल्ह्यात १० लाख लाभार्थीआयुष्मान भारत गोल्डन कार्ड योजनेत जिल्ह्यात १० लाख नागरिक निश्चित करण्यात आले आहेत. यात शहरातील ५ लाख तर ग्रामीण भागात ५ लाख नागरिकांचा समावेश आहे. जि.प. कार्यक्षेत्रातील ५ लाखांपैकी आतापर्यंत २ लाख ३५ हजार नागरिकांनीच कार्ड काढलेले आहे. अजून ५० टक्के नागरिकांनी कार्ड काढलेले नाही.
दहा दिवसांत काढलेल्या कार्डची स्थितीतालुका गोल्डन कार्डछत्रपती संभाजीनगर १२,०५८फुलंब्री ७६३८सिल्लोड १७,१४५सोयगाव ५,७०६कन्नड १४,२००खुलताबाद ४,४१२गंगापूर १२,२५७वैजापूर १६,८०३पैठण १०,३७६