दोन कोविड लॅब असणारे हे देशातील पहिले विद्यापीठ. कोवीडच्या काळात पीएच.डी.चे व्हायवा, अध्यापन, तसेच परीक्षा ऑनलाइन पद्धतीने यशस्वीपणे घेतल्या. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘फाइल ट्रॅकिंग सीस्टिम’ सुरू केली. अनावश्यक खर्चावर बंदी घातली. कोरोनाच्या काळात सीएसआर फंडातून जवळपास १० ते ११ कोटी रुपयांचा निधी विद्यापीठाला मिळाला. कौशल्याभिमुख कोर्सेसवर आम्ही भर देत आहोत.
नवीन शैक्षणिक धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी करण्याचे आमचे नियोजन आहे. सन २०१६च्या विद्यापीठ कायद्यामध्ये महाविद्यालयांच्या अकॅडेमिक ऑडिटची तरतूद आहे. आतापर्यंत ५० कॉलेजेसचे ऑडिट व्हायचे. आता ३५० ऑडिटची प्रक्रिया सुरू आहे. महिनाभरात ती पूर्ण होईल. त्यामध्ये आम्ही कॉलेजला श्रेणी देणार आहोत. शैक्षणिक गुणवत्तेबाबत आम्ही कोणतीही तडजोड करणार नाही. पेटंट ॲक्टिव्हीट वाढविण्यावर भर देणार आहोत.
सामाजिक बांधिलकी म्हणून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तसेच राज्याचे पहिले मुख्यमंंत्री यशवंतराव चव्हाण यांची प्रतिमा विद्यापीठात लावली. बाबासाहेबांना संगीतमय श्रद्धांजली अर्थात, ‘गीत भीमायन’ हा रखडलेला प्रकल्प मार्गी लावला असून, तो लाखो लोकांच्या पसंतीला उतरला आहे.
- कुलगुरू डॉ.प्रमोद येवले