तसेच डीएफसी युनिक स्टडी टेक्निकच्या साहाय्याने दहावी बोर्ड (स्टेट, सीबीएसई, आयसीएसई) परीक्षेत १०० टक्के गुण कसे प्राप्त करता येतील, दहावी परीक्षेत सर्वोत्कृष्ट यश मिळविण्यासाठी आणि ध्येयपूर्तीसाठी डीएफसीच्या फाउंडेशन कोर्सची मुख्य भूमिका काय आहे, याविषयी ज्ञानदीप फाउंडेशन सेंटरचे संचालक तथा प्रसिद्ध वक्ते गाेविंद काबरा विद्यार्थी व पालकांशी संवाद साधतील.
या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी http://bit.ly/NTSE-DFC या लिंकवर क्लिक करावे. प्रथम नोंदणी करणाऱ्या १,००० विद्यार्थ्यांना झूम ॲक्सेस आणि सेल्फ स्टडी चार्ट देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९२२५३१८७२७ या क्रमांकावर संपर्क करावा.
चौकट :
वेबिनार करिअरसाठी दिशादर्शक
इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी आयोजित वेबिनार म्हणजे भविष्याचा वेध घेणारी सुवर्णसंधीच आहे. करिअरची योग्य वाट निवडीच्या या काळात त्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेली माहिती दिशादर्शक ठरू शकते. या संधीचा फायदा घेण्यासाठी विद्यार्थी व पालकांमध्ये या वेबिनारबाबत मोठी उत्सुकता असल्याचे दिसून येते.
सूचना
डीएफसी व कॅम्पस क्लबचा लोगो घेणे