शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

औरंगाबादमध्ये कैदी रुग्णांसाठी घाटी रुग्णालयाची मार्गदर्शिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 3:14 PM

विविध गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या कैद्यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले जाते. कैदी रुग्ण किती दिवस रुग्णालयात राहावा, याबाबतचे अधिकार ठराविक व्यक्तींकडेच असायचे. या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कैदी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे या समितीकडून या कैदी रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 

औरंगाबाद : विविध गुन्ह्यांतील आरोपी असलेल्या कैद्यांची प्रकृती बिघडल्यास त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले जाते. कैदी रुग्ण किती दिवस रुग्णालयात राहावा, याबाबतचे अधिकार ठराविक व्यक्तींकडेच असायचे. या अधिकाराचे विकेंद्रीकरण करून कैदी रुग्ण दाखल करून घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून या कैदी रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेण्यात येणार असल्याचे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ३ जुलै रोजी अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. बैठकीत पोलिसांमार्फत उपचाराकरिता रुग्णालयात दाखल होणाऱ्या कैदी रुग्णांसाठी मार्गदर्शिका तयार करण्यात आली. यावेळी उपअधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे, स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य, न्याय वैद्यकीयशास्त्र विभागप्रमुख डॉ. कैलास झिने, डॉ. सय्यद अश्फाक, डॉ. गजानन सुरवाडे, डॉ. प्रभाकर जिरवणकर, डॉ. उद्धव खैरे, डॉ. विजय गायकवाड, डॉ. विकास राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कैदी रुग्णांना विशेष सुविधा मिळत असल्याचा आरोप सर्व स्तरावरून सुरूझाल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यामुळे याची गंभीर दखल घेत कैदी रुग्णांना उपचार देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 

समितीच्या अध्यक्षपदी वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या गैरहजेरीमध्ये आरएमओ हे काम पाहणार आहेत. सदस्य म्हणून न्याय वैद्यकशास्त्र विभागप्रमुख, शल्यचिकित्साशास्त्र विभागप्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभागप्रमुख आणि संबंधित विभागाचे पथकप्रमुख काम पाहणार आहेत. 

समितीची असेल ही जबाबदारीकैदी रुग्ण घाटीत दाखल झाल्याबाबत समिती अध्यक्षांना कळविणे बंधनकारक असेल. त्यांच्या गैरहजेरीत आरएमओ यांना माहिती द्यावी लागणार आहे. कैदी रुग्ण हा वॉर्ड क्रमांक १० मध्ये दाखल करणे बंधनकारक असेल. कैदी रुग्ण अत्यवस्थ असेल तर पथकप्रमुखांनी त्याला जनरल वॉर्डमध्ये असल्यास याच्या इत्थंभूत नोंदी कैदी रुग्णाच्या केसपेपरवर करणे आवश्यक राहील. ४८ तासांपेक्षा जास्त कैदी रुग्ण उपचार घेण्यासाठी भरती राहत असेल तर समिती अध्यक्षांना कळवून समितीची बैठक घेणे बंधनकारक असणार आहे. कैदी रुग्ण भरती झाल्यानंतर दर तीन दिवसांनी कैदी रुग्ण समितीने बैठक घेऊन कैद्यांच्या उपचाराबाबत, भरतीस आवश्यक तो निर्णय समितीला घ्यावा लागणार आहे. 

कैदी रुग्ण घाटी रुग्णालयात दाखल करून घेण्याबाबत मार्गदर्शिका तयार करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली कैदी रुग्ण समितीही स्थापन केली आहे. कैदी रुग्णांबाबतच्या निर्णयाचे अधिकार समितीला देण्यात आले आहेत. - डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद. 

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीPrisonतुरुंगMedicalवैद्यकीय