वाशी : अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेत अल्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या शिक्षकास भूम न्यायालयाने पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली़ दरम्यान, वाशी पोलिसांनी त्या शिक्षकास त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे गजाआड केले़पोलिसांनी सांगितले की, कळंब तालुक्यातील गंभीरवाडी येथील शिक्षक अरविंद सर्जेराव देवकर याने त्याच्या शाळेत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेले़ या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता़ पोलिसांनी त्याच्या शोधार्थ अनेक पथके रवाना केली होती़ आरोपीने सतत जागा बदलत नाशिक गाठले तेथून तीर्थक्षेत्र असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे वास्तव्य करत मुलीवर अत्याचार केले. आधुनिक तंत्रज्ञान आणि खबऱ्यामार्फत पोनि विनोदकुमार म्हेत्रे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याचा शोध घेतला़ त्र्यंबकेश्वर येथे कारवाई करून त्याला अल्पवयीन मुलीसमवेत पकडले. आरोपीजवळील पैसे संपल्यामुळे आरोपी हा पोलिसांच्या हाती लागला. यावेळी त्याच्या ताब्यातून दोन विषारी बाटल्याही पोलिसांना मिळाल्या असल्याचे समजते़ पोलिसांनी वेळीच त्यास ताब्यात घेतले नसते तर विचित्र प्रकार समोर आला असता, असे म्हटले जात आहे़ शिक्षक देवकर याच्याविरूध्द भादंवि कलम ३६३,३७६ व बालकांचे लैंगिक शोषणापासून अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ६ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोदकुमार म्हेत्रेवार करत आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला काळीमा फसणाऱ्या शिक्षकाविरूध्द कठोर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक वर्गासह पालक, शिक्षणप्रेमी नागरिकांतून होत आहे़ (प्रतिनिधी)
विद्यार्थिनीला पळवून नेणारा गुरूजी कोठडीत
By admin | Published: June 16, 2014 12:28 AM