शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

गुरुजींची शाळा; टक्का देऊन गुपचूप मिळविला जातो अत्युत्कृष्ट ‘सीआर’

By विजय सरवदे | Published: May 22, 2023 12:27 PM

निवडश्रेणीसाठी संघटनांमध्ये प्रबळ असलेले शिक्षकांचा खटाटोप : विभागाकडे साडेनऊशे शिक्षकांचे प्रस्ताव

छत्रपती संभाजीनगर : निवडश्रेणी मिळाली की, शिक्षकाला थेट एक वेतनवाढीचा फायदा होतो. सध्या निवडश्रेणीची प्रक्रिया अंतिम करण्याच्या हालचाली सुरू असून, अतित्कृष्ट गोपनीय अहवाल लिहून घेण्यासाठी अनेक शिक्षक मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या शोधार्थ फिरत आहेत. विशेष म्हणजे, ‘सीआर’ लिहून घेण्याच्या या व्यवहारात मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याच्या तक्रारी ऐकूनही शिक्षक संघटनांनी मात्र, ‘तेरी भी चूप अन् मेरी भी चूप’ असा पवित्रा घेतला आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ३१ मेपूर्वी शिक्षकांचे बहुतांशी प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाही सध्या ‘ॲक्टिव्ह मोड’वर आहे. दरम्यान, २४ वर्षांची सलग सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना निवडश्रेणी दिली जाणार आहे. यासाठी शिक्षण विभागाकडे साधारणपणे ९५० शिक्षकांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. ज्या वर्षी शिक्षकांची सेवा २४ वर्षे पूर्ण झालेली आहे, त्यापूर्वीच्या दोन वर्षांचे अतित्कृष्ट गोपनीय अहवाल निवडश्रेणीसाठी अनिवार्य आहेत. याशिवाय संबंधित शिक्षकांवर कोणतीही कारवाई झालेली नसावी, त्याची विभागीय चौकशी झालेली अथवा सुरू नसावी, हे निकष आहेत.

दुसरीकडे शिक्षकांना दरवर्षी गोपनीय अहवाल दिले जातात. मात्र, मागील दोन वर्षांपासून औरंगपुरा येथील जि.प.च्या प्रशासकीय इमारतीचे काम सुरू असल्यामुळे स्टेशन रोडलगत चेलीपुरा हायस्कूलच्या इमारतीमध्ये शिक्षण विभाग स्थलांतरित झाला आहे. त्यामुळे अनेकांचे गोपनीय अहवाल गहाळ झाले आहेत. परिणामी, शिक्षकांना आता नव्याने गोपनीय अहवाल हस्तगत करावे लागत आहेत.

पैसे द्या अन् सीआर घ्या!संघटनांमध्ये प्रबळ असलेले शिक्षक हे स्वत:च अति उत्कृष्ट असा शेरा लिहून गोपनीय अहवाल तयार करतात व मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांच्या हातावर ‘दाम’ ठेवून अहवालावर फक्त स्वाक्षऱ्या घेत आहेत. मात्र, ज्यांनी अध्यापनाबरोबरच राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रामाणिकपणे परिश्रम घेतलेले आहेत, ते शिक्षक निवडश्रेणी शर्यतीतून बाजूला फेकले जात आहेत. काही जणांनी शिक्षक संघटनांकडे यासंबंधीची तक्रार केली, पण ‘तेही आपलेच आणि तुम्हीही आपलेच, या भूमिकेतून पदाधिकारी या प्रकरणाकडे दुर्लक्ष करीत आहेत.

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद