योगेश राजेंद्र दुधाट, चंद्रकांत बाबासाहेब वाळके (रा. लासूर स्टेशन) आणि राजेंद्र छोटुलाल जैस्वाल (रा. धनगरवाडी, औराळा) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले की, योगेश हा कारमधून गुटखा घेऊन जाणार असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून घोंगरगाव ते गाढे पिंपळगाव रस्त्यावर मंगळवारी सापळा रचून कार पकडली. कारमध्ये आरोपी दुधाट आणि वाळके होता. कारची झडती घेतली असता त्यात गुटख्याच्या १२ गोण्या आढळल्या. वीरगाव पोलीस ठाण्यात याविषयी गुन्हा दाखल करण्यात आला. तर आरोपींनी धनगरवाडी औराळा येथील एका शेतकऱ्याच्या गोठ्यालगत लपवून ठेवलेल्या गुटखा, पानमसालाच्या १७ गोण्या पोलिसांनी जप्त केल्या. चौकशीत हा माल जैस्वालचा असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला. ही कारवाई पोलीस निरीक्षक भागवत फुंदे, फौजदार गणेश राऊत, संदीप सोळंके, हवालदार विक्रम देशमुख, विठ्ठल राख, दीपेश नागझरे, वाल्मीक निकम, रामेश्वर धापसे, ज्ञानेश्वर मोटे, योगेश तरमाळे आणि संतोष डमाळे यांनी केली.
औरंगाबाद ग्रामीणमध्ये सहा लाखांचा गुटखा जप्त
By | Published: December 04, 2020 4:05 AM