बाजारसावंगी येथील बहुसंख्य किराणा दुकान व पानसेंटरवर खुलेआम गुटखाविक्री केली जात आहे. त्याचबरोबर दरेगाव पाडळी, सोबलगाव झरी, वडगाव, धामणगाव, रेल इंदापूर, कनकशीळ इंदापूर, ताजनापूर, येसगाव वढोद या गावांमध्येदेखील गुटखाबंदीचा व्यवसाय जोमाने सुरु आहे. अशा ठिकाणी धाड टाकून कारवाई करण्याऐवजी संबंधित विभागाकडून कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे, या सर्व गावांमध्ये गुटख्याचा पुरवठा करणारी फार मोठी यंत्रणा सक्रिय झाली आहे. औरंगाबाद शहरातून दिवसाढवळ्या एका वाहनातून गावागावांत मालाचा पुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, हेल्मेट नसेल तर पोलीस सर्वसामान्य नागरिकांना दंड भरण्यास मजबूर करतात. आणि दुसरीकडे अशाप्रकारे गुटखा गावोगावी जातो. तेव्हा पोलीस निद्रावस्थेत कसे असू शकतात, अशा अवैध धंद्यावर नेमकी कारवाई कोण आणि कधी करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
--------
तरुण पिढी होते बर्बाद
बाजारसावंगी परिसरातील बहुतांश गावांत अवैधरित्या गुटखाविक्री केली जात आहे. त्यामुळे गावागावांतील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून गुटखा, तंबाखू सेवनाने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, गावातील सार्वजनिक ठिकाणी थुंकत असल्याने गावात विद्रूपीकरण वाढले आहे. रात्री उशिरापर्यंत पानटपरी खुली राहत असल्याने गावातील सामाजिक स्वास्थ्यदेखील बिघडत चालले आहे.
--------
गुटखाबंदी असे संकल्पित चित्र वापरु शकता.