शहरं
Join us  
Trending Stories
1
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
3
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
5
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
6
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
7
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
8
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
9
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
10
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
12
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
13
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
14
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
15
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
16
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
17
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
18
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
19
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
20
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान

पिंपळनेरमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापा; ३० लाखांचा गुटखा जप्त

By सोमनाथ खताळ | Published: March 21, 2023 11:25 AM

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे दिसत आहे.

बीड : तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत गुटख्याच्या गोदामावर छापा टाकण्यात आला आहे. यात जवळपास ३० लाखांपेक्षा अधिक गुटखा जप्त केला आहे. तसेच याचा म्हाेरक्याही जाळ्यात अडकल्याचे सांगण्यात येत आहे. या गुटख्याची पाळे'मुळे' परराज्यापर्यंत आहेत. आज पहाटेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.

मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने परळी तालुक्यात जवळपास ३३ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या पथकाने गेवराई शहरात सव्वा लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. त्यानंतर आता एलसीबीने मंगळवारी पहाटे पिंपळनेर परिसरातील एका गोदामावर छापा मारून तब्बल ३० लाख रूपयांपर्यंत गुटखा जप्त केला आहे. या प्रकरणात एलसीबीचे अधिकारी पिंपळनेर पोलीस ठाण्यात ठाण मांडून असून दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड