शहरं
Join us  
Trending Stories
1
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
2
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
4
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
5
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
6
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
7
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
8
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
9
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
10
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
11
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
12
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
13
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
14
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
15
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
16
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
17
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
19
'पुष्पा २' चा ट्रेलर लाँच बिहारच्या 'पटना'मध्येच का झाला? मेकर्सने सांगितलं कारण
20
SBI Healthcare Opportunities Fund : २५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न

हदगाव,अर्धापूर, माहूरमध्ये कॉंग्रेस,धर्माबाद, उमरी राकॉंकडे

By admin | Published: July 15, 2014 12:01 AM

नांदेड : जिल्ह्यातील हदगाव, उमरी आणि धर्माबाद पालिका तसेच माहूर आणि अर्धापूर नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची १४ जुलै रोजी बिनविरोध निवड झाली.

नांदेड : जिल्ह्यातील हदगाव, उमरी आणि धर्माबाद पालिका तसेच माहूर आणि अर्धापूर नगरपंचायत अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची १४ जुलै रोजी बिनविरोध निवड झाली. हदगाव, अर्धापूर, माहूरमध्ये कॉंग्रेस, उमरी आणि धर्माबादमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसने बाजी मारली. अमित अडसूळ नगराध्यक्षहदगाव : हदगाव पालिकेतील काँग्रेसचे गटनेता अमित अडसूळ यांची बिनविरोध निवड झाली, उपाध्यक्षपदाची माळ कॉंग्रेसचे अहेमद पटेल यांच्या गळ्यात पडली. हदगाव नगरपालिका काँग्रेसच्याच ताब्यात आहे़ १७ पैकी १५ सदस्य काँग्रेसचेच आहेत़ त्यामुळे नगराध्यक्ष कॉंग्रेसचाच होणार हे निश्चित होते़ परंतु माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष होते. मंगल मुधोळकर व प्रभाकरराव देशमुख, अमित अडसूळ यांची नावे पदासाठी चर्चेत होती़ प्रभाकरराव देशमुख याच्यावर लोकसभेला शिवसेनेचे सुभाष वानखेडे यांना मदत केल्याचा ठपका होता़ त्यामुळे मंगला मुधोळकर यांना हे पद मिळावे अशी नगरसेवकांची अपेक्षा होती़ कारण अमित अडसूळ हे मनसेतून काँग्रेसमध्ये नव्यानेच आले व नगरसेवक झाले़ यावेळी माजी नगराध्यक्षा अंजनाबाई सोनुले, सुनील सोनुले, प्रभाकर देशमुख, अनिल पाटील, अश्फाक अहेमद, खदीरखान, बाबुअप्पा पिचकेवार, आनंद कांबळे, सर्व नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते़ निवडणूक निर्वाचन अधिकारी केशव नेटके, तहसीलदार संतोष गोरड यांनी विजयीतांना प्रमाणपत्र प्रदान केले. नगराध्यक्ष जाहीर होताच फटाके, बँड वाजवून अमित अडसूळ यांचे स्वागत करण्यात आले.राजेश देशमुख उमरीचे नगराध्यक्षउमरी : येथील ऩप़च्या नगराध्यक्षपदी राजेश उर्फ बालासाहेब नरसिंगराव देशमुख तर उपनगराध्यक्षपदी प्रवीण बाबुराजा सारडा यांची बिनविरोध निवड झाली़ सकाळी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडीची विशेष बैठक पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी व्ही़एल़ कोळी यांच्या अध्यक्षतेखाली झाली़ यावेळी दोन्ही पक्षासाठी प्रत्येकी एक-एक अर्ज दाखल झाल्याने सदरची निवड बिनविरोध झाल्याचे कोळी यांनी जाहीर केले़ मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे हे सहा़अधिकारी म्हणून उपस्थित होते़ नगराध्यक्ष पदाची निवड जाहीर होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून निवडीचे स्वागत केले़ यावेळी झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत मावळते नगराध्यक्ष रफीक कुरेशी यांची सभागृह प्रतोद म्हणून निवड करण्यात आली़ नवनिर्वाचित नगराध्यक्ष, उपाध्यक्ष व प्रतोद यांची विजयी रॅली काढण्यात आली़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ़ बापूसाहेब गोरठेकर यांच्या आदेशाचे पालन करीत उमरीच्या शहराच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती नगराध्यक्ष राजेश देशमुख यांनी दिली़ सभापती शिवाजीराव देशमुख, अ‍ॅड़ भाऊसाहेब देशमुख गोरठेकर, जि़ प़ सदस्य मारोतराव कवळे, युवानेते शिरीषराव गोरठेकर, संजीव सवई, गणेशराव गाढे, पांडुरंग देशमुख गोरठेकर, डॉ़ विक्रम देशमुख, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष लिंगराम पाटील कवळे, अनिल दर्डा, श्रीनिवास अनंतवार, जावेदखान, सोनू वाघमारे, सुरेश सवई, राम येरावार आदींसह सर्व नगरसेवक उपस्थित होते़ अर्धापूर : पठाण नगराध्यक्षपदीअर्धापूर : येथील नगरपंचायतच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी नासेरखान जाफरखान पठाण यांची तर उपाध्यक्षपदी व्यंकटेश उर्फ राजू केदारेश्वर शेट्टे यांची निवड झाली़१४ जुलै रोजी झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षपदी प्रभाग क्ऱ ४ चे नगरसेवक नासेरखान पठाण यांची तर उपनगराध्यक्षपदी प्रभाग क्ऱ३ चे व्यंकटेश उर्फ राजू शेट्टे यांची निवड झाली़ नगरपंचायतमध्ये काँग्रेसचे एकूण १४ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ३ असे बलाबल आहे़ याप्रसंगी काँग्रेसच्या माजी नगराध्यक्षा रेखाताई काकडे, अखतरउल्ला बेग, सलीम कुरेशी, मनीषा सिनगारे, शोभाताई कानोडे, मिनाक्षी राऊत, मुसव्वीर खतीबसह १४ नगरसेवक उपस्थित होते़ राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक यावेळेस अनुपस्थित होते़पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी हे होते़ तर त्यांना तहसीलदार सतीश सोनी, मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर, नायब तहसीलदार एस़ एऩ देलमडे, एम़ एऩ बोथीकर, मंडळ अधिकारी वामनराव उबाळे यांनी सहकार्य केले़ नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपाध्यक्षांचे सर्वांनी स्वागत केले़ कुंडलवाडी: शेंगूलवार प्रभारी कुंडलवाडी : गत सहा महिन्यांपासून प्रकृतीच्या कारणामुळे कुंडलवाडी नगरपालिका अध्यक्ष के़बी़ रेड्डी हे दीर्घ रजेवर असून ४ जुलै रोजी नगरपालिकेत उपस्थित राहून पुन्हा नगराध्यक्षपदाचा पदभार नगरीचे उपाध्यक्ष डॉ़ एस़ एस़ शेंगुलवार यांच्याकडेच सोपविला आहे़ गत सहा महिन्यापासून नगरीच्या प्रभारी अध्यक्षपदी डॉ़ शेंगुलवार हे विराजमान असून के़बी़ रेड्डी हे उपचारासाठी मुंबई येथे आहेत़ गौतमी कांबळे माहूर नगराध्यक्ष माहूर : येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदी गौतमी सारंगधर कांबळे यांची तर उपाध्यक्षपदी शोभाताई सुधीरराव महामुने यांची निवड झाली. १७ सदस्यीय नगरपंचायतमध्ये कॉंग्रेसचे ४, राष्ट्रवादी ३, शिवसेना ४ आणि अपक्ष १ तर राकॉतून बंडखोरी करुन बाहेर पडलेले ५ असे १७ सदस्य आहेत. सहा. जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नगराध्यक्षा, उपाध्यक्षा निवडीची प्रक्रिया पार पडली. नगराध्यक्षपदासाठी गौतमी कांबळे, शिवलिंग टाकळीकर कॉग्रेसकडून तर बालाजी वाघमारे सेनेकडून उमेदवार होते. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी मराठी बाराखडीनुसार वाघमारे यांच्या नावासाठी मतदान घेण्यात आले. त्यांना ६ मतदान पडले तर कॉंग्रेसच्या गौतमी कांबळे यांना ११ मतदान झाले. वाघमारे यांना एकही मतदान झाले नाही. एक सदस्य तटस्थ राहिला. उपाध्यक्षपदासाठी महामुने यांनाही ११ मते मिळाली. याकामी सहाय्यक म्हणून तहसीलदार डॉ. आशीषकुमार बिरादार, कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी, देवीदास सीडाम, शेख मजहर, नाना पाटील यांनीही सहकार्य केले. यावेळी कॉंग्रेसकडून पक्ष निरीक्षक म्हणून किशोर स्वामी, बलवंसिंह गाडीवाले, तालुकाध्यक्ष अनंतराव केशवे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष समाधान जाधव, विनोद राठोड, किशन राठोड, अमजद पठाण, अरुण आळणे, उद्योजक सुमीत राठोड, थावरा नाईक, दुल्हेखा पठाण, अहेमद कुरेशी, मेघराज जाधव, प्रमोद राठोड, अमजद पठाण, वाईकर, भारत कांबळे आदींसह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. धर्माबाद:कुलकर्णी धर्माबाद : येथील पालिकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विनायकराव कुलकर्णी व उपाध्यक्षपदी रमेश पाटील बाळापूरकर यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी प्रविण धरमकर यांनी काम पाहिले त्यांना मुख्याधिकारी निलेश सुंकेवार यांनी सहकार्य केले. राकॉंचे १५ आणि कॉंग्रेसचे ३ असे पक्षीय बलाबल आहे. यावेळी विश्वनाथ पाटील बन्नाळीकर, दत्ताहरी चोळाखेकर, अजरोद्दीन फारुखी, बाबाराव पाटील बाळापूरकर, संजय पाटील, शेख शादूल, साईनाथ पूजरवाड, अ‍ॅड. वसंतराव खानापूरकर, किरण बेंद्रे, डॉ. केशटवार, डी.रामचंद्र होते.(वार्ताहर)