शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले
4
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
5
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
6
'हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न झालं पूर्ण! अभिनेत्री म्हणाली- "लंडनमध्ये जाऊन..."
7
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
8
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
9
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
10
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
11
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
12
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
13
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
15
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
16
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
17
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
18
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
19
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
20
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही

हज यात्रेकरूंचे पहिले प्रशिक्षण उत्साहात

By admin | Published: May 22, 2016 12:21 AM

औरंगाबाद : मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातून यंदा पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे पहिले प्रशिक्षण शिबीर शनिवारी ऐतिहासिक जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे घेण्यात आले.

औरंगाबाद : मराठवाडा आणि अहमदनगर जिल्ह्यातून यंदा पवित्र हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंचे पहिले प्रशिक्षण शिबीर शनिवारी ऐतिहासिक जामा मशीद परिसरातील सईद हॉल येथे घेण्यात आले. हज कमिटीशिवाय टूर कंपन्यांमार्फत जाणाऱ्या यात्रेकरूंनीही प्रशिक्षण सत्रास अलोट गर्दी केली होती.आयुष्यात एकदा तरी पवित्र हज यात्रेला जाण्याची संधी मिळावी अशी प्रत्येक भाविकाची इच्छा होते. सौदी अरेबिया सरकारने मागील काही वर्षांपासून भारताचा कोटा कमी केल्याने यात्रेला जाण्यासाठी भाविकांमध्ये जोरदार स्पर्धा लागली आहे. अनेक वर्षे हज कमिटीमार्फत क्रमांकच लागत नाही. तीन-चार वर्षे वेटिंगमध्ये थांबल्यावर अनेक भाविकांना संधी प्राप्त होते.मराठवाड्यातील आठ जिल्हे व अहमदनगर येथील यात्रेकरू मागील काही वर्षांपासून चिकलठाणा विमानतळावरून थेट जेद्दा येथे रवाना होत आहेत. यात्रेकरूंच्या सोयीसाठी मरकज-ए-हुज्जाज कमिटीतर्फे विविध प्रशिक्षण शिबीर घेण्यात येतात. २०१६ मध्ये नऊ जिल्ह्यांतील २ हजार ३०२ यात्रेकरूजाणार आहेत. त्यांच्यासाठी शनिवारी पहिले प्रशिक्षण घेण्यात आले. ‘हज का सफर’या विषयावर दिवसभर तज्ज्ञांनी भाविकांना मार्गदर्शन केले. मौलाना नसीम मुफ्ताही, हुज्जाज कमिटीचे अध्यक्ष करीम पटेल, डॉ. सदरूल हसन नदवी यांनी विविध सत्रांमध्ये भाविकांना सविस्तर मार्गदर्शन केले. शेवटी भाविकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरेही तज्ज्ञांनी दिली.आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चिकलठाणा विमानतळावरून सर्व भाविक रवाना होतील.